News Flash

जाणून घ्या, काय आहेत शिवप्रतिष्ठानच्या मागण्या?

प्रकाश आंबेडकर यांची ब्रेन मॅपिंग चाचणी करण्यात यावी.

शिवप्रतिष्ठानतर्फे पुणे, सांगली, मुंबईसह राज्याच्या विविध शहरांमध्ये गुरुवर्य सन्मान मोर्चा काढण्यात आला.

शिवप्रतिष्ठानतर्फे पुणे, सांगली, मुंबईसह राज्याच्या विविध शहरांमध्ये गुरुवर्य सन्मान मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर पुण्यात शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी नेमके काय म्हटले आहे, याचा घेतलेला हा आढावा…..

> गेले दोन महिने भीमा कोरेगाव प्रकरणामुळे राज्यातील वातावरण दुषित झाले. यात संभाजी भिडे गुरुजी यांचे नाव गोवण्यात आले. मात्र, या प्रकरणाशी भिडे गुरुजींचा दुरान्वयाने देखील संबंध नाही.

> १ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगावमधील वातावरण ज्या वादग्रस्त फलकावरुन बिघडले ते फलक लावणाऱ्यांना तत्काळ अटक करावी आणि त्यांची चौकशी करावी.

> ३१ डिसेंबर रोजी पुण्यातील शनिवारवाड्यातील प्रांगणात एल्गार परिषद भरवण्यात आली होती. या परिषदेत जातीय तेढ निर्माण करणारी पत्रके वाटण्यात आली. याशिवाय मंचावर चिथावणी देणारी भाषणे झाली. जिग्नेश मेवाणी, उमर खलिद आणि माजी न्या. बी. जी. कोळसे यांनी भाषणे केली. याच लोकांनी पूर्वनियोजित कट करुन ही दंगल घडवून आणली.

> ३ जानेवारी २०१८ रोजी महाराष्ट्रात सर्वत्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, हा बंद शांततामय रितीने पाळला गेला नाही. या दिवशी झालेल्या हिंसाचारात मालमत्तेचे नुकसान झाले. ही नुकसान भरपाई सरकार देणार आहे. मात्र, सरकारने नुकसान भरपाई देण्याऐवजी ज्यांनी नुकसान केले त्यांच्याकडून वसूली करावी. हा बंद पुकारणाऱ्या प्रकाश आंबेडकर आणि संबंधित मंडळींकडून नुकसानीची भरपाई वसूल करावी.

> भीमा कोरेगावात राहुल फटांगडे या तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणातील गुन्हेगारांना अद्याप अटक झालेली नाही. त्यांना देखील तत्काळ अटक करावी.

> पुण्यात एल्गार परिषदेत नक्षलवादी संघटनांचा सहभाग होता, असे पोलीस तपासात समोर आले होते. या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीतून काय निष्पन्न झाले, याचा खुलासा करावा.

> प्रकाश आंबेडकर यांची ब्रेन मॅपिंग चाचणी करण्यात यावी.

> संभाजी भिडे गुरुजी गेल्या तीन ते चार वर्षांपासून त्या परिसरात गेलेले नाही. पण तरी देखील प्रकाश आंबेडकर यांनी भिडे गुरुजींचे नाव या प्रकरणात घेतले आहे. त्यांना ही कोणी दिली, याची देखील चौकशी व्हावी.

> भीमा कोरेगाव प्रकरणात तक्रार देणाऱ्या महिलेने संभाजी भिडे यांना बघितल्याचा उल्लेख केला होता. मात्र, पोलीस चौकशीत अजूनही संभाजी भिडेंविरोधात कोणताही पुरावा सापडलेला नाही. त्यामुळे या महिलेला ताब्यात घेऊन तिची पोलीस चौकशी करावी.

> भिडे गुरुजी व एकबोटेंवरील गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2018 2:46 pm

Web Title: what are the demands of shiv pratishthan hindustan in rally to support sambhaji bhide
Next Stories
1 ‘एल्गार परिषद भरवणारेच खरे गुन्हेगार’
2 ‘प्लास्टिक बंदी’चा फार्सच
3 कारवाईच्या धसक्यामुळे कागदी पिशव्यांचा वापर!
Just Now!
X