ऑक्टोबर महिना संपत आला तरी पाऊस कोसळतोय. असं का होतयं? पावसाला नक्की काय झालं आहे. हवामानखात्याने १६ ऑक्टोबरला मान्सून परतल्याचं सांगिलं असतानाही राज्यातील अनेक भागांबरोबरच दक्षिणेकडील राज्यांमध्ये एवढा पाऊस कशामुळे पडत आहे?, तो कधीपर्यंत पडणार आहे? दिवाळीमध्ये पाऊस पडणार का? असे अनेक प्रश्न सामान्यांना पडले आहेत. याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न…

दरम्यान, काही ठिकाणी जोरात पाऊस, तर काही ठिकाणी रखरखीत ऊन हे वातावरणातील बदल ग्लोबल वॉर्मिंगमुळे होत असल्याचे पुणे वेध शाळेचे अनुपम कश्यपी यांनी सांगितले. असेच वातावरण नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.