20 thousand Government Job Openings: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी विजयादशमीला सरकारी नोकरीची सोन्यासारखी संधी देणारी माहिती दिली आहे. २०, ००० सरकारी नोकऱ्यांसाठीची “स्टाफ सिलेक्शन कमिशनची (CGLE 2022) महाभरती” बाबत माहिती देणाऱ्या मनसे मार्गदर्शन पुस्तिकेचे ठाकरेंनी केले. राजगड मुख्यालयात प्रकाशन सोहळा पार पडला. स्टाफ सिलेक्शन कमिशनने केंद्र सरकारी- प्रशासकीय व्यवस्थेतील २०,००० पदांसाठीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध केली आहे. कम्बाईन्ड ग्रॅज्युएट लेव्हल एक्झामिनेशन- २०२२ (CGLE 2022) या परीक्षेद्वारे या पदांवर भरती होणार असून त्यासाठी पदवीधरांना अर्ज करता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्पर्धा परीक्षेचं नेमकं महत्त्व काय, त्यासाठी अर्ज कसा भरायचा, पूर्वतयारी कशी करायची यासंदर्भात मनसे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी मराठी तरुणाईसाठी नोकरीची महासंधी- स्टाफ सिलेक्शन कमिशनची महाभरती ही मार्गदर्शन पुस्तिका बनवली आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी या पुस्तिकेची मराठी तरुणांना मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

SSC- CGLE 2022 मनसे मार्गदर्शन पुस्तिका डाऊनलोड कुठे कराल?

https://uploadnow.io/f/3gP2zX2

कम्बाईन्ड ग्रॅज्युएट लेव्हल एक्झामिनेशन- २०२२ परीक्षेचा अर्ज कुठे कराल?

https://ssc.nic.in

23 वर्षीय भारतीय तरुणाला जागतिक बँकेत नोकरीची ऑफर; ना ऑनलाईन अर्ज ना वशिला उलट ‘हा’ मार्ग निवडला

दरम्यान, कीर्तिकुमार शिंदे लिखित ही मार्गदर्शक पुस्तिका डिजिटल स्वरूपात उपलब्ध असेल याचा लाभ घेऊन जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी या स्पर्धा परीक्षेचा फॉर्म भरावा असे आवाहन मनसे नेते अमित ठाकरे यांनी केले आहे. तसेच या स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी ठिकठिकाणी मनविसेच्या माध्यमातून मार्गदर्शन शिबिरं आयोजित करण्यात येणार असल्याचेही अमित ठाकरेंनी सांगितले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 20 thousand government job openings where to apply for cgle 2022 mns amit thackeray published book svs
First published on: 06-10-2022 at 11:31 IST