सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे पर्यटनासाठी गेलेल्या चार विद्यार्थींनीचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. या समुद्रात पाचजण बुडाले आहेत. त्यापैकी चौघांचे मृतदेह सापडले असून एकजण बेपत्ता आहे. NDTV ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

पिंपरी चिंचवड येथील सैनिक अकादमीचे ३५ जण देवगड येथे पर्यटनासाठी गेले होते. दरम्यान, दुपारी ३ च्या सुमारास काही विद्यार्थी पाण्यात उतरले. परंतु, समुद्रातील भरतीचा अंदाज न आल्याने पाचजण बुडाले.

Arvind kejriwal
“विद्यार्थ्यांच्या हितापेक्षा राजकीय स्वार्थाला प्राधान्य”; दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवालांना फटकारले
telangana suicides
तेलंगणात ११वी आणि १२वीचा निकाल जाहीर होताच काही तासांतच सात विद्यार्थ्यांची आत्महत्या
ragging case in Pune, pune,
पुण्यातील रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात
Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल

पाण्याचा अंदाज न आल्याने हे विद्यार्थी बुडाले असल्याची प्राथमिक माहिती अधिकाऱ्यांनी दिली. प्रेरणा डोंगरे, अंकिता गालटे, अनिशा पडवळ आणि पायल बनसोडे अशी या चार मृत विद्यार्थीनींची नावे आहेत. मृतदेह उत्तरतपासणीकरता जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा >> पर्यटनासाठी आलेल्या दोन मुलींचा तलावात बुडून मृत्यू; यवतमाळच्या जेतवनमधील घटना

अजित पवारांनीही घेतली दखल

“सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे पर्यटनासाठी गेलेल्या पुणे येथील संकल्प सैनिक अकादमीच्या प्रशिक्षणार्थींचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडून या घटनेची माहिती घेण्यात आली असून अन्य प्रशिक्षणार्थींना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मृत्यू पावलेल्या प्रशिक्षणार्थींच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. समुद्र किनारी, डोंगर दऱ्यांमध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या सर्वांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे कळकळीचे आवाहन आहे”, अशी एक्स पोस्ट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

नितेश राणेंनीही व्यक्त केलं दुःख

गेल्याच महिन्यात नागपूरमध्येही घडली होती घटना

येथील नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हिवरी (ता. यवतमाळ) येथील जेतवन पर्यटनस्थळी आलेल्या दोन मुलींचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शनिवारी १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली. रिया किशोर बिहाडे (१२) रा. महागाव कसबा, काव्या धम्मपाल भगत (११) रा. मंगरूळपिर जि. वाशिम अशी बुडून मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत.