जालना – जालन्यात झालेल्या बिबट्याच्या हत्येप्रकरणी ३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी अंबड तालुक्यातील भालगाव रोडवरील पुलाखाली मृतावस्थेत एक बिबट्या आढळून आला होता. अंबड – भालगाव येथील ग्रामस्थांनी बिबट्या मृतावस्थेत आढळल्याची माहिती वन विभागाला दिली होती. त्या माहितीवरून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला होता. त्यानंतर आता याप्रकरणी ३ जणांवर वन्यजीव कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बिबट्याची हत्या करणारे ३ आरोपी निष्पन्न झालेत. दरम्यान, आरोपींच्या शोधासाठी वन विभागाचे २ पथकाने रवाना करण्यात आल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी विजयकुमार दौंड यांनी दिली.

अंबड ते भालगाव या रस्त्याच्या शंकर राजाराम भोजने यांच्या शेताजवळ सडलेल्या अवस्थेत आढळलेला बिबट्या व्हायरल व्हिडिओतला असल्याची कबुली वनविभागाने दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन दिवसापूर्वी जालन्यातील घनसावंगी कुंभारपिंपळगाव परिसरात अज्ञात लोकांनी बिबट्याला मारहांन केल्याचा प्रकार समोरं आला होता. त्या मारहानीचा व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रसारित झाला होता. त्या चित्रफितीतील हा बिबट्या असल्याची माहिती वनविभागाने दिली. या प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये शिकार करणे, प्राण्याची तस्करी करणे, अवैध वाहतूक करणे या कलमानव्ये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याची माहिती विजयकुमार दौंड, वनपरिक्षेत्र अधिकारी, जालना यांनी बुधवारी (दि. २६) संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास जालना वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात दिली..