कोकणात होणारा नाणार रिफायनरी प्रकल्प पाकिस्तानमध्ये चालला, असा दावा भाजपा नेते आशिष शेलार यांनी केला आहे. यावर उद्धव ठाकरे बोलतील का? रिफायनरी प्रकल्प पाकिस्तानात नेण्यामागे आंतरराष्ट्रीय कट होता का? असे सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केले. याला शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. नाणार रिफायनरी प्रकल्पाला कोकणवासीयांनी विरोध केला. त्यामुळे सर्व कोकणातील जनतेला त्यांना देशद्रोही म्हणायचे असेल, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. ते वरळीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

आशिष शेलार काय म्हणाले?

“मोदी सरकार रिफायनरी प्रकल्प भारतात आणू पाहत होते. हा प्रकल्प महाराष्ट्रातील कोकणात येणार होता. त्यामुळे कोकणातील मराठी तरुणांना रोजगार आणि गुंतवणूकीची संधी मिळणार होती. पण, इतक्या टोकाचा विरोध करण्यात आला की, हा प्रकल्प पाकिस्तानमध्ये चालला आहे. यावर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षातील लोक बोलतील का?” असे आव्हान शेलार यांनी दिलं आहे.

हेही वाचा : प्रियंका चतुर्वेदींबाबत संजय शिरसाटांनी केलेल्या ‘त्या’ दाव्यावर आदित्य ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “अशा…”

“यातून काय हेतू साध्य झाला? देशाच्या आणि मराठी माणसाच्या हिताचं काय झालं? रिफायनरी पाकिस्तानला नेण्यामागे आंतरराष्ट्रीय कट होता का?” असे सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केले होते.

हेही वाचा : “आपल्याला गद्दारांना गाडायचं आहे”, उद्धव ठाकरेंच्या विधानावर शिंदे गटाचं प्रत्युत्तर; म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेलारांच्या विधानावर आदित्य ठाकरे म्हणाले, “नाणारला कोकणवासीय आणि स्थानिक जनतेने विरोध केला आहे. त्यामुळे आम्ही कोकणवासीयांबरोबर उभे आहोत. कदाचित भाजपा नेत्यांना सर्व कोकणवासीयांना देशद्रोही म्हणायचे असेल. भाजपाच्या मनात असलेला महाराष्ट्र द्वेष स्पष्ट आहे.”