अहिल्यानगर: अतिवृष्टीग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करा, असे आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. यावेळी पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई उपस्थित होते.

मंत्री विखे व मंत्री देसाई यांनी आज, बुधवारी कर्जत तालुक्यातील होलेवाडी, चिलवाडी, नवलेवाडी येथे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहाणी केली. तसेच ग्रामस्थांशी संवादही साधला. या भागातून जाणाऱ्या कुकडी कालव्याच्या रूंदीकरणाचे आणि मजबुतीकरणाचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री विखे यांनी कुकडी प्रकल्पाच्या अधीक्षक अभियंत्यांना दिले आहेत.

प्रामुख्याने कुकडी कालव्याच्या अवतीभोवती झालेले अतिक्रमण आणि भराव खचल्याने कालव्यातून मोठ्या प्रमाणात आलेले पाणी शेजारच्या वाड्यावस्त्यांपर्यंत आले. त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होतात. ही बाब ग्रामस्थांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.

मंत्री विखे पाटील यांनी कुकडी कालव्याच्या अधीक्षक अभियंता श्रीमती अहिरराव यांना तातडीने या कामाचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले. यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासित करून त्यांनी सांगितले की, अन्य काही कामही जलसंधारण विभागाशी संबंधित असल्याने यासंदर्भात विभागाचे अभियंता गायमुखे यांनी गांभीर्याने निर्धारीत मंत्री शंभूराज देसाई यांनी दुख जाणून घेण्यासाठी सर्व मंत्री वेगवेगळ्या भागांत गेले आहेत.

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कोण काय टीका करतो, याला आम्ही महत्त्व देत नाही. महाविकास आघाडीचे सरकार असताना रेड कार्पेट पाहाणी दौरे कोणी केले, त्याचे पुढे काय झाले आणि त्या सरकारच्या काळात काय घडले, यावर आम्हाला बोलता येईल. मात्र, आजच्या परिस्थितीत राजकारण आम्हाला करायचे नाही, अशा शब्दांत मंत्री देसाई यांनी आ. रोहित पवार यांच्या समाज माध्यमावरील टिकेला उतर दिले. वेळेत याबाबत प्रस्ताव तयार करावेत, त्यालाही मान्यता लगेच देत असल्याचे त्यांनी सांगितले.

कमी लोकसंख्येची वस्ती असली तरी अनेक वर्षे पुलाची मागणी पूर्ण झाली नाही, या तक्रारीचे गांभीर्य घेवून पुलाच्या कामासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आणि कार्यकारी अभियंता यांनी समन्वयाने काम सुरू करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या.

‘मविआ’काळात रेडकार्पेट पाहाणी – शंभूराज देसाई

मंत्री शंभूराजे देसाई यांनी शेतकऱ्यांचे दुःख जाणून घेण्यासाठी सर्व मंत्री राज्याच्या वेगवेगळ्या भागांत गेले आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कोण काय टीका करतो, याला आम्ही महत्त्व देत नाही. महाविकास आघाडीचे सरकार असताना रेडकार्पेट पाहाणी दौरे कोणी केले, त्याचे पुढे काय झाले? आणि त्या सरकारच्या काळात काय घडले, यावर आम्हाला बोलता येईल. मात्र, आजच्या परिस्थितीत राजकारण आम्हाला करायचे नाही, अशा शब्दांत मंत्री देसाई यांनी आमदार रोहित पवार यांच्या टिकेला उत्तर दिले.