अहिल्यानगर: आदिवासी समाजाच्या खडांबे खुर्द (ता. राहुरी) येथील स्मशानभूमीमध्ये बेकायदा पोयटा (माती) उत्खनन करणाऱ्या तसेच मृतदेहांची अवहेलना केल्याच्या आरोपावरून राहुरी पोलिसांनी एकास अटक केली आहे. या घटनेने राहुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे तसेच आदिवासी समाजातूनही संताप व्यक्त केला जात आहे.

भगवान कलापुरे (रा. खडांबे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असल्याची माहिती राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली. आरोपीविरुद्ध ॲट्रॉसिटी कलमान्वयेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल विभागाने जेसीबी व ढंपर जप्त केला आहे. घटनास्थळी माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी भेट दिली. घटनास्थळी आदिवासी समाजासह गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी तनपुरे यांनी तहसीलदार नामदेव पाटील व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्याकडे केली आहे.

खडंबे खुर्द गावातील आदिवासी समाजाच्या स्मशानभूमीतील पोयटा (माती) चोरून नेत असताना एक जीसीबी तसेच एक चार ब्रासचा ढंपर रात्री एकच्या सुमारास गावातील नागरिकांनी अडवला व महसूल, पोलीस प्रशासनाच्या ताब्यात दिला. सरपंच अण्णा माळी यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी ही कारवाई केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवैध उत्खनन करणाऱ्या माफियांनी स्मशानभूमीवरही डोळा ठेवल्याचे यातून उघड झाले आहे. या बेकायदा उत्खननावेळी दफन केलेले मानवी सांगाडेही बाहेर आल्याची तक्रार आहे.