एका कार्यकर्त्याने विरोधी पक्षनेते अजित पवारांना चिट्ठी देत वाचून घ्या म्हटलं. यावर अजित पवारांनी मिश्किल टिपण्णी केली. या चिट्ठीत म्हटलं होतं की, बारामती, माढात ज्या प्रमाणे विकास झाला तसा उस्मानाबादचा विकास करा. हे वाचल्यानंतर अजित पवारांनी भरसभेत या कार्यकर्त्याला “आमदार पाडा आणि विकास करा”, असा खोचक टोला लगावला. ते शनिवारी (१ ऑक्टोबर) उस्मानाबादमध्ये एस. पी. साखर कारखान्याच्या गळीत हंगाम उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

कार्यकर्त्याने दिलेल्या चिट्ठीत लिहिलं होतं की, शेतकरी जीवंत राहिला, तर पक्ष १०० टक्के जीवंत राहतो. शेतकरी सक्षम करण्यासाठी पाणी महत्त्वाचे आहे. १५० आमदारच का, २८८ का नाही? तसेच सोयाबीनच्या भावावरही विचारणा केली होती.

“अरे मग तेच सांगतोय ना शहाण्या”

यावर अजित पवार म्हणाले, “अरे मग तेच सांगतोय ना शहाण्या. बरं झालं याने सांगितलं. शरद पवार १० वर्षे कृषीमंत्री असताना राष्ट्रीय फलोत्पादन योजना त्यांनी आणली. देशातील शेतकऱ्यांचं ७२ हजार कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं. कांद्याचे दर पडले तेव्हा शरद पवारांनी निर्यातबंदी उठवली आणि कांदा निर्यात करून चांगला भाव मिळवून दिला. सगळ्यांना आधारभूत किंमत, विद्यापीठं दिली.”

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : “उसाच्या २६५ बेण्याच्या नादाला लागू नका”, भाव हवा असेल तर कोणता ऊस लावावा? अजित पवारांनी दिली यादी…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“केंद्रीय कृषीमंत्रालयात फिरा, ते आजही म्हणतात की, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत जेवढे कृषीमंत्री झाले त्यात शेतकऱ्यांबद्दल बारकाईने जाण असलेला एकच कृषीमंत्री झाला आणि तो म्हणजे शरद पवार,” असंही अजित पवारांनी नमूद केलं.