Ajit Pawar : निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर महायुतीने आज त्यांच्या योजनांचा लेखाजोखा मांडण्याकरता पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. यामध्ये त्यांनी त्यांचं रिपोर्ट कार्ड केलं. या दोनपानी रिपोर्ट कार्डमध्ये त्यांनी गेल्या दोन वर्षांत केलेल्या कामांचा आढावा घेतला आहे. दरम्यान, या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पत्रकारांनी अनेकविध प्रश्न विचारले. आमदारांच्या पक्षबदलांवरूनही विचारण्यात आलं. तेव्हा अजित पवारांनी पत्रकारांना उत्तरे दिली.

“तुमच्या पक्षातील एक एक आमदार सोडून चालले आहेत. अतुल बेनकेही जाण्याची शक्यता आहे. त्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती”, असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर अजित पवार म्हणाले, “तुम्ही काळजी नका करू. मी खंबीर आहे. अतुल बेनके तिथे गेले नाहीत. मी ज्यांना तिकिट देणार नाही ते तिकडे जात आहेत, ज्यांना देणार आहे ते येथे राहतील”, असं अजित पवार म्हणाले.

हेही वाचा >> CM Eknath Shinde : “लाडकी बहीण योजनेला धक्का लावायचा प्रयत्न केलात तरी…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना इशारा!

“निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. विरोधक सातत्याने फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत होते. पण सर्व निवडणूक आयोगाच्या हातात असतं. त्यांना स्वायत्ता दिली आहे. उद्धव ठाकरेंचं सरकार गेलं आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली भाजपा-शिवसेना सरकार अस्तित्वात आलं. वर्षभराने आम्ही समाविष्ट झालो. गेले दीड वर्षे सर्वजण काम करतोय. २०२२-२४ चं रिपोर्ट कार्ड देत असातना सातत्याने आमच्याबद्दल सांगितलं जातं की तिजोरी मोकळी केली आहे, कर्जबाजारी झालो आहोत. मी अतिशय जबाबादारीने सांगतोय, निवडणुका जवळ येत असताना कॅबिनेट होतात. तेव्हा अनेक निर्णय घेतले जातात. शेवटी शेवटी काही राहून गेलेले विषय येत असतात. त्यातून विषय मंजूर करतो. काही विचारपूर्वक योजना दिल्या. टिंगळटवाळी झाली, बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. लाडकी बहीण योजना पॉप्युलर झाली. याबाबत महिला समाधान आहे. सर्व घटकांतील महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला”, असंही अजित पवार सुरुवातील म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लाडकी बहीण योनजेमुळे विरोधक गडबडले

“योजनांना मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद पाहून विरोधक गडबडले आहेत. माझी लाडकी बहीण योजनेच्या यशामुळे गडबडून गेले आहेत. आम्ही ही योजना जाहीर केली तेव्हा या योजनेची अंमलबजावणी होणारच नाही, असं विरोधकांनी सांगितलं. अर्ज भरले जातील पण पैसे मिळणार नाही, असंही सांगितलं. पण आता पाच महिन्यांचे मिळून साडेसात हजार रुपये मिळाले. आहेत. सकारात्मक बदल पचनी पडत नसल्याने हे पैसे निवडणूक होईपर्यंतच मिळतील, असंही ते म्हणाले. मी अतिशय जबाबदारीने संगितली आहे, या याजोनेसाठी सुरुवातीला १० हजार कोटींची तरतूद केली होती. नंतर, ३५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली. आता एकूण ४५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महिलांना खात्री द्यायची आहे की ही योजना तात्पुरती नाही. तुमचे पैसे तुमचा अधिकार आहे. कोणीही काढून घेऊ शकत नाही”, असं आश्वासनही त्यांनी दिलं.