बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. दोन्ही उमेदवारांकडून सध्या दणक्यात प्रचार सुरु आहे. या पार्श्वभूमीवरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज बारामती मतदारसंघात सभा पार पडली. या सभेत बोलताना त्यांनी शरद पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

“काही वडीलधारे जुना काळ आठवत असतील तर त्यांना म्हणा की जुना काळ बाजूला ठेवा, आता नवीन काळ पाहा. सासूचे चार दिवस संपले आता सुनेचे चार दिवस येवूद्या. नुसते सासू सासू…मग सुनेने काय नुसते बघत बसायचे का? आपण घरची लक्ष्मी म्हणून त्यांच्याकडे पाहतो. मग ४० वर्ष झाले तरी बाहेरची कशी? किती वर्ष झाल्यावर या घरची ते सांगा?”, असा टोला अजित पवार यांनी नाव न घेता शरद पवार यांना लगावला.

quiziframe id=30 dheight=282px mheight=417px

हेही वाचा : उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास! “आम्ही महाराष्ट्रात ४८ जागा जिंकू भाजपाची ४५ + ची संख्या…”

अजित पवार काय म्हणाले?

“मी एक वेगळी भूमिका घेतली. मी एकटा नाही तर प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील आणि ८० टक्के पेक्षा जास्त आमदारांनी ही भूमिका स्वीकारली. याचे कारण आपले प्रश्न सुटावे. गेल्या १२ वर्षात केंद्र सरकारचा बारामती मतदारसंघात निधी आलेला नाही”, असे म्हणत अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला.

ते पुढे म्हणाले, “या सभेला बसलेले काही लोक आज माझ्या सभेला आले. मी ज्यांच्या विरोधात लढतो आहे, ते आले की त्यांच्याही सभेला जातील. पण दोन डगरीवर हात कशाला? आपल्याकडे एक पद्धत आहे कुंकू एकाचेच लावायचे असते. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे. आता जे लोक तुम्हाला ओळखतही नव्हते, ते पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. काहीजण भावनिक मुद्दा करतील, पण तुम्ही वेगळा विचार करु नका. विधानसभेला बघू असे म्हणताण आणि तुमच्या पायावर धोंडा पाडून घेताल”, असे अजित पवार म्हणाले.