कर्नाटकातील निवडणुकांचा निकाल हाती आल्यापासून महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. सर्वच पक्षांकडून लोकसभा निवडणुकांसाठी जागावाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. आगामी वर्ष हे निवडणुकांचं वर्ष असेल असंही राजकीय वर्तुळातून सांगण्यात येतंय. दरम्यान, यावरूनच महाविकास आघाडीत आतापासूनच धुसफुस सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शिवसेनेत बंडखोरी झाल्याने महाविकास आघाडीत आता आकडेवारीच्या तुलनेत राष्ट्रवादी मोठा पक्ष ठरला आहे. यावरून अजित पवारांनी भाष्य करताच महाविकास आघाडीतील इतर घटकपक्षांनीही अजित पवारांना धारेवर धरलं. मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी वेगळाच मुद्दा मांडला आहे.

हेही वाचा >> “महाविकास आघाडीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ”, अजित पवारांच्या वक्तव्यावर राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “सगळ्यांची डीएनए टेस्ट…”

आम्हीच मोठा भाऊ- अजित पवार

“आपण महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहोत. आघाडी आपल्याला मजबूत ठेवायची आहे. पण हे करत असताना लक्षात ठेवा की तुमची ताकद जास्त असेल तरच तु्म्हाला महाविकास आघाडीत महत्त्व दिलं जाईल. याआधीच्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसच्या जागा जास्त असायच्या. जागा वाटप करताना आपल्याला लहान भाऊ म्हणून भूमिका घ्यावी लागायची. पण आता आपण काँग्रेसपेक्षा मोठे भाऊ झालो आहोत. कारण त्यांच्या ४४ जागा आहेत आणि ५४ जागा आहेत. उद्धव ठाकरेंकडे ५६ आमदार होते. हे गणित आहे,” असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरायचा आहे. मात्र त्याआधीच आम्ही मोठा भाऊ आहोत असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अजित पवारांनी सांगितलं आहे. राजकीय वर्तुळात या वक्तव्याची चर्चा होऊ लागली आहे. यानंतर महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या ठाकरे गट आणि काँग्रेसकडूनही प्रतिक्रिया आली आहे.

हेही वाचा >> “महाविकास आघाडीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ”, अजित पवारांच्या वक्तव्यावर नाना पटोलेंचा पलटवार; म्हणाले “कोणी गर्व करावा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहित पवार काय म्हणाले?

अजित पवारांच्या याच वक्तव्याबाबत आज रोहित पवारांनाही विचारण्यात आले. ते म्हणाले की, “महाविकास आघाडीत मतभेद नक्कीच नाहीत. मनभेदही नाहीत. दादा बोलत असताना आकड्यांवर बोलतात. राष्ट्रवादीचा आकडा काही पक्षांपेक्षा जास्त आहे. तो आकडा पाहून मोठा भाऊ साहजिकच आहे बोलणं. जेव्हा निवडणूक लढवली जाते तेव्हा आपण एकाचवेळी जन्मलेलो ट्विन्स आहोत.आपण एका विचाराने जेव्हा भाजपाविरोधात लढत असतो तेव्हा तितकीच ताकद लावणं महत्त्वाचं आहे.”