कराड : शिवशाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरागामी महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाणांच्या विचारांची शिकवण आहे. आज मात्र, काही वक्तव्य होत असताना ती विरोधकांची असू द्यात अथवा सत्ताधारी पक्षाच्या व्यक्तीची असू द्यात यशवंतरावांच्या सुसंस्कृत महाराष्ट्राला सहन होणार नसून, परवडणारी सुध्दा नसल्याची तीव्र नाराजी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. जो पर्यंत राजकारणात आहे तोपर्यंत यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा सोडणार नसल्याचे ते म्हणाले.

महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा देशाचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या ११३ व्या जयंतीदिनी त्यांच्या कराडमधील समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर ते माध्यमांशी बोलताना भाजपचे मंत्री नितेश राणे व आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार बोलत होते. दिली.

राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार अतुल भोसले, मनोज घोरपडे, सचिन पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराज आदी या वेळी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, महाराष्ट्र कसा असावा याची शिकवण यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला दिली. पण, अलीकडे दोन्हीकडील काही नेत्यांची विधाने न सहन होणारी, न परवडणारी असल्याने विरोधक असो अथवा सत्तेतील व्यकी असो त्यांनी कायदा आणि सुव्यस्थेच भान राखावे, ज्यांना देशाबद्दल प्रेम आहे असा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात देशात व महाराष्ट्रात आहे, आपण इतिहास वाचला. इतिहासात अनेक मोठमोठ्या लोकांनी जी काही पुस्तक लिहिलीत, इतिहासाच संशोधन केले, इतिहासाची माहिती खोलवर मिळवली ते पहा.

छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर हिंदवी स्वराज्यात जे लोक होते, त्यात मुस्लिम लोक सुद्धा आहेत. दारुगोळा कोण संभाळत होते? हे पहावे अशी कितीतरी उदहारण आपल्याला देता येतील, आपल्या देशाबद्दल अभिमान वाटणारे जो मुस्लिम घटक आहेत, ते देशप्रेमीच आहेत असे अजित पवारांनी सांगितेल.

यशवंत विचार सोडणार नाही

जो पर्यंत राजकारणात आहे तोपर्यंत यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा सोडणार नसल्याचे ठामपणे सांगत अजित पवार म्हणाले,  सुसंस्कृत महाराष्ट्राची शिकवण यशवंतराव चव्हाण यांनी दिली. यशवंतराव चव्हाणांची शिकवण पुढे नेण्याचा आपला सातत्याने प्रयत्न आहे. मी राजकीय जीवनात आहे, तो पर्यंत यशवंतराव चव्हाणांची विचारधार कधीही सोडणार नाही किंवा ढळू देणार नाही. चव्हाणसाहेबांच्या विचारधारेनेच महाराष्ट्राच, सगळ्या समाजाच भलं होणार आहे. आणि हा विचार सदैव डोळ्यासमोर ठेवून चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राच्या सर्व घटकांना न्याय देण्याच काम आपल्याकडून होणार असल्याची ग्वाही अजित पवारांनी दिली.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेल्या आदर्श विचारांवरच राज्य शासन काम करीत आहे. त्यांच्या विचारांच्या माध्यमातूनच सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम शासन करीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाला घेऊन स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी समाजामध्ये समतेचा भाव निर्माण केला. त्यांचा आदर्श आजच्या नव्या पिढीने घ्यावा असे आवाहनही पवार यांनी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रकल्पग्रस्तांच्या लवकरच बैठक कोयनेसह अन्य प्रकल्पग्रस्तांचे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी लवकरच राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री  मकरंद पाटील व संबंधीतांसमवेत बैठक घेणार आहे. प्रकल्पग्रस्तांचे सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मारकासाठीही प्रयत्न केले जातील अशीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वेळी बोलताना दिली.