आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. देशभरातील सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. महाराष्ट्रात शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून मतदारसंघनिहाय चाचपणी सुरू आहे. अशातच औरंगबाद लोकसभा (छत्रपती संभाजीनगर) मतदारसंघातील उमेदवारीसाठी माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. हो दोन्ही नेते औरंगाबादमधून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छूक असल्याचं बोललं जात आहे. यावर अंबादास दानवे यांनी त्यांचं मत मांडलं आहे.

अंबादास दानवे म्हणाले, कोणाचंही नाव चर्चेत नाव असो, शेवटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतील तेच होणार. माझं नाव चर्चेत असो अथवा चंद्रकांत खैरे यांचं, तिथे आम्ही दोघांनीच असलं पाहिजे असं काही नाही. तिथे तिसरं नावही असू शकतं. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक जिंकणं हेच आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे. मला वाटतं नाव कोणाचं पुढे येतं हे महत्त्वाचं नाही. उद्धव ठाकरे सांगतील तेच होणार. मी आणि चंद्रकांत खैरे आम्ही दोघे जिल्हा स्तरावर काम करतोय त्यामुळे लोकांमध्ये आमच्या नावांची चर्चा असेल आणि आमचं नाव पुढे येत असेल. परंतु, उद्धव ठाकरे यांना वाटलं तर एखादा तिसरा पर्यायही असू शकतो. त्यात काही वावगं नाही. उद्धव ठाकरे सांगतील तो आदेश पाळला जाईल.

अंबादास दानवे हे काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बोलत होते. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही औरंगाबादमधून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छूक आहात का? त्यावर दानवे म्हणाले, शिवसेनेत इच्छेला काही अर्थ नाही, असं माझं मत आहे. मुळात संघटनेत इच्छा असूच नये. व्यक्तिला इच्छा, आकांक्षा असावी, परंतु, शिवसेनेचं नेतृत्व इतकं सक्षम आहे की, त्यांना माहिती आहे कोणाला काय करावं, कोणाला कोणत्या जागेवर बसवावं, त्यांना सगळी माहिती आहे. त्यांना आमच्यापेक्षा जास्त माहिती आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर लोकसंभेचा त्यांचा अभ्यास आहे.

हे ही वाचा >> “त्या कंडक्टरला लोळंस्तोवर मारेन”, एसटी आगार प्रमुखांना आमदार संतोष बांगरांची धमकी; म्हणाले, “पायाखाली…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंबादास दानवे म्हणाले, संघटेत इच्छेचा विषय नसतो, संघटनेत नेतृत्वाचा जो आदेश आहे त्याला महत्त्व असतं. संघटनेला जे आवश्यक आहे ते शिवसैनिक म्हणून करणं हे माझं कर्तव्य आहे. माझ्या इच्छेला अर्थ नसतो आणि तो नसावा.