ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी स्थापना केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकारणीची घोषणा झाली आहे. यानुसार राज्य अध्यक्षपदी अविनाश पाटील तर राज्य कार्याध्यक्षपदी माधव बावगे यांची एकमताने निवड करण्यात आली. डॉ. नरेंद्र दाभोलकर हयात असताना २०१० मध्ये अविनाश पाटील यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली. यानंतर त्यांनी मे २०२२ पर्यंत एकूण १२ वर्षे कार्याध्यक्ष म्हणून काम केले. आता २०२२ ते २०२५ या त्रैवार्षिक कालावधीसाठी अविनाश पाटील यांची राज्य अध्यक्षपदी, तर माधव बावगे (लातूर) यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली. महाराष्ट्र अंनिसच्या स्थापनेपासून (१९८९) अध्यक्ष असलेले एन. डी. पाटील यांच्या निधनानंतर आता अविनाश पाटील यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीची विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठक ३, ४, ५ जून २०२२ रोजी औरंगाबाद येथील महात्मा गांधी मिशन विद्यापीठ येथे नुकतीच संपन्न झाली. या राज्यस्तरीय बैठकीस ३२ जिल्ह्यातून राज्य व जिल्हास्तरीय १७२ प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सन २०२२ ते २०२५ या तीन वर्षासाठी ८४ पदाधिकाऱ्यांची नूतन राज्य कार्यकारिणी एकमताने निवडण्यात आली आहे.

अंनिसची राज्य कार्यकारिणी खालील प्रमाणे…

अध्यक्ष –
अविनाश पाटील (धुळे)

उपाध्यक्ष –

डॉ प्रदीप पाटकर (पनवेल, रायगड)
उत्तम कांबळे (नाशिक)
प्रा शामराव पाटील (इस्लामपूर, सांगली)
महादेवराव भुईभार (अकोला)
डॉ रश्मी बोरीकर (औरंगाबाद) 

कार्याध्यक्ष –
माधव बावगे (लातूर)

प्रधान सचिव –

संजय बनसोडे (इस्लामपूर, सांगली)
गजेंद्र सुरकार (वर्धा)
नंदकिशोर तळाशीलकर (मुंबई)
डॉ ठकसेन गोराणे (नाशिक) 

राज्य सरचिटणीस –

विदर्भ विभाग- संजय शेंडे (नागपूर) आणि बबन कानकिरड (अकोला)
खान्देश विभाग- विनायक सावळे (शहादा, नंदुरबार) आणि ॲड रंजना पगार गवांदे (संगमनेर,अहमदनगर)
मराठवाडा विभाग- शहाजी भोसले (औरंगाबाद) आणि रूकसाना मुल्ला (लातूर)
कोकण विभाग- विजय परब (मुंबई) आणि सचिन थिटे (मुंबई)
दक्षिण पश्चिम महाराष्ट्र विभाग- सुधाकर काशीद ( मोहोळ, सोलापूर) आणि कृष्णात कोरे (कोल्हापूर)

इतर विभागाचे कार्यवाह, सहकार्यवाह व सदस्य पुढीलप्रमाणे –

बुवाबाजी विरुद्ध संघर्ष विभाग –

कार्यवाह- ॲड गोविंद पाटील (सोलापूर)
सहकार्यवाह- विष्णू लोणारे (भंडारा), प्रा डॉ आदिनाथ इंगोले (नांदेड) 

विविध उपक्रम विभाग –

कार्यवाह- अनिल करवीर (पालघर)
सहकार्यवाह- रामदास देसाई (कोल्हापूर) 

वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प –

कार्यवाह- दिगंबर कट्यारे (जळगाव)
सहकार्यवाह- विलास निंभोरकर (गडचिरोली) आणि प्रकाश कांबळे (वर्धा) 

महिला सहभाग विभाग –

कार्यवाह- आरती नाईक (पनवेल, रायगड)
सहकार्यवाह- सारिका डेहनकर (वर्धा) 

युवा सहभाग विभाग –

कार्यवाह- प्रियंका खेडेकर (पनवेल,रायगड), 
सहकार्यवाह- रुपेश वानखेडे (यवतमाळ) आणि अमोल चौगुले (अंबरनाथ, ठाणे) 

जोडीदाराची विवेकी निवड विभाग – 
कार्यवाह- हर्षल जाधव (कोल्हापूर) 

जात पंचायतीला मूठमाती अभियान –
कार्यवाह- कृष्णा चांदगुडे (नाशिक) 

मिश्र विवाह व्यवस्थापन विभाग –

कार्यवाह- दिलीप आरळीकर (लातूर),
सहकार्यवाह- अतुल बडवे (जालना) 

प्रशिक्षण विभाग –

कार्यवाह- सुरेश बोरसे (शिरपूर, धुळे) 
सहकार्यवाह- सुधाकर तट (बनसारोळा, बीड) 

विवेक जागर प्रकाशन –

कार्यवाह- विशाल विमल (पुणे), 
सहकार्यवाह- नवल ठाकरे (धुळे) 

अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका संपादक मंडळ –

संपादक- प्रा डॉ नितीन शिंदे (इस्लामपूर, सांगली) 
कार्यकारी संपादक- उत्तम जोगदंड (कल्याण, ठाणे), 
सहसंपादक- प्रा डॉ शामसुंदर मिरजकर (इस्लामपूर, सांगली), 
सदस्य- प्रा डॉ मांतेश हिरेमठ (कोल्हापूर), प्रा सुशील मेश्राम (नागपूर), डॉ अरुण शिंदे (कोल्हापूर), बाळू दुगडूमवार ( नांदेड) आणि प्रल्हाद मिस्त्री (नाशिक) 
पत्रिका सल्लागार- किशोर बेडकिहाळ (सातारा), डॉ प्रदीप पाटकर (पनवेल, रायगड) आणि संध्या नरे पवार (मुंबई) 

मुखपत्र व्यवस्थापन विभाग –

कार्यवाह- अजय भालकर (इस्लामपूर, सांगली)
सहकार्यवाह- राजेंद्र फेगडे (नाशिक) आणि तुकाराम शिंदे (उस्मानाबाद) 

थॉट विथ अॅक्शन –

कार्यवाह- प्रा हर्षदकुमार मुंगे (पुणे) 

मानसिक आरोग्य व्यवस्थापन विभाग –

कार्यवाह- डॉ प्रदीप जोशी (जळगाव), 
सहकार्यवाह- डॉ अनिल डोंगरे (रायगड) 

विज्ञान बोध वाहिनी –

कार्यवाह- भास्कर सदाकळे (तासगाव, सांगली)
सहकार्यवाह- बाबा हालकुडे (लातूर) 

सांस्कृतिक अभिव्यक्ती विभाग –

कार्यवाह- मनोहर जायभाये (अंबेजोगाई, बीड)
सहकार्यवाह- एस एस शिंदे (डोंबिवली, ठाणे)

सोशल मीडिया व्यवस्थापन विभाग –

कार्यवाह- किर्तीवर्धन तायडे (नंदुरबार)
सहकार्यवाह- रविराज थोरात (पुणे) 

निधी व्यवस्थापन विभाग –

कार्यवाह- परेश शाह (शिंदखेडा, धुळे)
सहकार्यवाह – सुधीर निंबाळकर (ठाणे) 

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय समन्वय विभाग –
कार्यवाह- प्रा डॉ सुदेश घोडेराव (नाशिक) 

कायदेविषयक व्यवस्थापन विभाग –

कार्यवाह- ॲड मनीषा महाजन (पुणे), 
सहकार्यवाह- ॲड तृप्ती पाटील (डोंबिवली, ठाणे)

दस्तऐवज संकलन विभाग –
कार्यवाह- डॉ सुरेश बिऱ्हाडे (धुळे) 

कार्यालयीन व्यवस्थापन विभाग –
कार्यवाह- उत्तरेश्वर बिराजदार (लातूर) 

विवेक वाहिनी विभाग –

कार्यवाह- प्राचार्य डॉ सविता शेटे (बीड)
सहकार्यवाह- प्राचार्य डॉ विठ्ठल घुले (परभणी) 

निमंत्रित

प्राचार्य अनिरुद्ध जाधव (लातूर), विजय सालंकर (नागपूर), कॉ बाबा अरगडे (नेवासा, अहमदनगर), सुशीला मुंडे व प्राचार्य मच्छिंद्रनाथ मुंडे (नवी मुंबई), सुरेखा भापकर (डोंबिवली, ठाणे), नितीनकुमार राऊत (अलिबाग, रायगड), हरिदास तम्मेवार (लातूर), उल्हास ठाकूर (पनवेल, रायगड), प्रा डॉ नरेश आंबिलकर (भंडारा)

हेही वाचा : “हमीद-मुक्ता गटाने ७ कोटींचा ट्रस्ट ताब्यात घेतला”; अंनिसच्या अध्यक्षपदावरून वाद, अविनाश पाटील यांचे गंभीर आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्य कार्यकारिणीची निवड सहमती समितीचे काम सुशीला मुंडे व नितीनकुमार राऊत सांभाळले. शनिवारी (४ जून २०२२) औरंगाबाद येथे विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठकीत निवड सहमती समितीच्या वतीने महा अंनिस राज्य कार्यकारिणी निवड घोषित करण्यात आली.