वाई : धोम वाई हत्याकांडातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिला सातारा जिल्हा न्यायालयाने एक वर्षासाठी वैद्यकीय उपचारासाठी जामीन मंजूर केला आहे. ती तब्बल सहा वर्षांनंतर मोठ्या कालावधीसाठी बाहेर येणार आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष पोळ हा वेगवेगळी कारणे दाखवत सुनावणी लांबवत असल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. साताऱ्यासह देशात गाजलेल्या तथाकथित डॉ. संतोष पोळ याने केलेल्या धोम (ता वाई ) हत्याकांड प्रकरणाची सातारा जिल्हा न्यायालयात पहिले जिल्हा व सत्र न्यायाधीश ए एस जाधव यांच्या न्यायालयात सुरु आहे. ऑगस्ट २०१६ मध्ये उघडकीस आलेल्या या गुन्ह्याची उकल वाई व सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केली होती. तेव्हापासून न्यायालयात खटला सुरु आहे. यावेळी माफीची साक्षीदार झालेली ज्योती मांढरे ही सुद्धा आजपर्यंत तुरुंगात आहे.

डॉ. संतोष पोळ याने सहा जणांचे खून करून ते मृतदेह त्याच्या फार्म हाऊस धोममध्ये पुरले होते. यातील एका खुनात ज्योती मांढरे हिचा सहभाग आढळला. २०१६ साली म्हणजे सहा वर्षापूर्वी हे हत्याकांड उजेडात आणल्यानंर वाईसह सातारा जिल्हा हादरून गेला होता.
धोम वाई हत्याकांडाची सुनावणी सातारा जिल्हा न्यायालयात सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून डॉ. संतोष पोळ याच्या लहरीपणामुळे या खटल्याची सुनावणी संथ गतीने सुरू आहे. कधी वकील बदलणे,तपास यंत्रणेवर वेगवेगळे आरोप करणे,उच्च न्यायालयात आव्हान देणे आदी कारणामुळे सुनावणी लांबत आहे.

हेही वाचा : मुंबई विमानतळावर पाच कोटी रुपयांचे कोकेन जप्त; परदेशी महिलेला अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्योती मांढरे हिच्या वतीने न्यायालयात तिला वैद्यकीय उपचारासाठी जामीन मिळण्यासाठी अर्ज केला असता न्यायालयाने पंधरा हजारच्या वैयक्तिक जात मुलाक्यावर व अटी, शर्तीवर जमीन अर्जास मंजुरी दिली आहे.एक वर्षात पोलिसांच्या परवानगी शिवाय सातारा जिल्हा सोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. ज्योती मांढरे हिच्या वतीने विक्रांतराव काकडे ( निंबुतकर) यांनी काम पाहिले सरकार पक्षाच्या वतीने ऍड मिलींद ओक यांनी काम पाहिले.