scorecardresearch

Premium

महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले “ज्या क्षणी…”

महाराष्ट्रात आमची शक्ती वाढलीच आहे. आगामी सर्व निवडणुकीत ही ताकद पहायला मिळेल; फडणवीसांना विश्वास

BJP, Devendra Fadanvis, Nagpur, Maharashtra Government,
महाराष्ट्रात आमची शक्ती वाढलीच आहे. आगामी सर्व निवडणुकीत ही ताकद पहायला मिळेल; फडणवीसांना विश्वास

गोव्याच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं नागपुरात जंगी स्वागत करण्यात आलं आहे. देवेंद्र फडणवीस येणार असल्याने विमानतळाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावत विजयासाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान फडणवीसांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसंदर्भात मोठं विधान केलं आहे.

गोव्याच्या निकालानंतर फडणवीस पहिल्यांदाच नागपुरात येत असल्याने विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी तयारी करण्यात आली होती. फडणवीस पोहोचताच विमानतळावर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यानंतर विमानतळापासून ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरापर्यंत रॅली काढण्यात येत आहे.

Chandrakant Patil claims mahayuti will win all 48 seats in the state
तुतारी वाजवा किंवा मशाली पेटवा, राज्यात सर्व ४८ जागा महायुतीलाच, चंद्रकांत पाटील यांचा दावा
supriya sule and sunetra pawar
सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार? भाषणातील विधानामुळे चर्चेला उधाण; म्हणाल्या, “तुम्ही संधी…”
ncp leader sunil tatkare marathi news, sunil tatkare lok sabha marathi news, sunil tatkare amit shah marathi news
लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपाचे सर्वाधिकार कोणाला?…सुनील तटकरे यांनी सांगितले ‘हे’ नाव
nana patole and devendra fadnavis
भाजपाचे काही आमदार काँग्रेसमध्ये जाणार? नाना पटोलेंच्या विधानामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “योग्य वेळी…”

गोव्याच्या विजयाचे शिल्पकार फडणवीस बालेकिल्ल्यात पोहोचताच जंगी स्वागत, उत्साह पाहून म्हणाले “२०२४ ला…”

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी हा जो सत्कार, स्वागत मी स्वीकारत आहे तो मोदींच्या आणि टीम गोव्याच्या वतीने असल्याचं म्हटलं. तसंच जी संधी मिळाली त्याचं सोनं करण्याचा मी प्रयत्न केला. हे आपल्या लोकांनी दिलेलं प्रेम असून मोदींच्या कामाला दिलेली पोचपावती आहे. त्याबद्दल मी आभारी आहे असंही म्हणाले.

महाराष्ट्रात २०२४ ला पूर्ण बहुमताचं भाजपा सरकार पहायला मिळेल असा विश्वास यावेळी फडणवीसांनी व्यक्त केला. “गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूरमध्ये मिळालेला विजय हा मोदींच्या कामाला लोकांनी दिलेली पावती आहे. महाराष्ट्रातही तीच स्थिती आहे,” असं फडणवीस म्हणाले.

“राजकारणात काहीही होऊ शकतं. पण मी काही म्हटलं तर लगेच सरकार पडणार अशा चर्चा सुरु होतात, याच्यात मला रस नाही. महाराष्ट्रात भाजपाचंच पूर्ण बहुमताचं सरकार मी आणणार,” असं यावेळी त्यांनी सांगितलं.

“ज्या क्षणी महाराष्ट्रात निवडणुका होतील तेव्हा भाजपा नंबर १ राहील आणि भाजपा आपल्या भरवशावर सरकार आणणार,” असं यावेळी फडणवीसांनी सांगितलं. नागपूर, मुंबई पालिका निवडणूक असो आम्ही नेहमी तयारच असतो असं सांगताना सध्या स्वतंत्र वाटचाल सुरु असल्याचं फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात आमची शक्ती वाढलीच आहे. आगामी सर्व निवडणुकीत ही ताकद पहायला मिळेल असंही ते म्हणाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp devendra fadanvis on maharashtra government in nagpur sgy

First published on: 17-03-2022 at 12:20 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×