एकनाथ शिंदेंच्या बंडाळीनंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. एकीकडे मुंबई, दिल्ली आणि गुवाहाटी अशा तीन ठिकाणी राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच दुसरीकडे बंडाळीमुळे अस्थिर झाल्याचं चित्र निर्माण झालेल्या राज्य सरकारवर विरोधकांकडून टीका देखील केली जात आहे. एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेच्या एकूण ३८ आमदारांनी बंडखोरी केल्याचं त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाची मोट सावरण्याचं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर असताना त्यावरच भाजपाकडून बोट ठेवलं जात आहे.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज माध्यमांशी बोलताना सध्याची राजकीय परिस्थिती आणि संजय राऊतांच्या ईडी चौकशीसंदर्भात प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी संजय राऊतांना खोचक टोला देखील लगावला.

भाजपाकडून सत्तास्थापनेचा मुहूर्त ठरला? “आषाढीची पूजा देवेंद्र फडणवीस करणार”, खासदाराचा दावा!

“राऊतांना हिशोब द्यावाच लागेल”

ईडीनं संजय राऊतांना चौकशीसाठी पाचारण केलेलं असताना राऊतांनी मात्र पूर्वनियोजित कार्यक्रमाचं कारण पुढे करत चौकशी पुढे ढकलण्यासाठी वेळ मागितली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते किरीट सोमय्यांनी राऊतांना खोचक टोला लगावला आहे. “किती दिवस लांब राहणार? किती दिवस लपणार? पत्राचाळ प्रकरणाचा ठिकाणा नाही. टीएमसी बँक, डीएचएफएल, वाधवान अशा प्रकरणांमध्ये जे पैसे लुटले गेले आहेत, त्यांचा हिशोब प्रवीण राऊतांना द्यावा लागेल. राहुल गांधींना चारवेळा जावं लागलं, अनिल परब चार वेळा गेले. राऊतांना हिशोब द्यावाच लागेल”, असं किरीट सोमय्या म्हणाले.

Maharashtra Political Crisis : मुंबई…दिल्ली…गुवाहाटी… सत्तास्थापनेच्या चर्चांनंतर राजकीय घडामोडींना वेग!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“..आता एकही आमदार उद्धव ठाकरेंना रीचेबल नाही!”

दरम्यान, यावेळी बोलताना किरीट सोमय्यांनी आज सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर करण्यात आलेल्या टीकेचा देखील समाचार घेतला. “महाराष्ट्राला तीन तुकड्यांमध्ये विभागण्याचा डाव आहे”, अशी टिप्पणी सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली होती. त्यावर बोलताना किरीट सोमय्यांनी शिवसेनेवर खोचक टीका केली आहे. “शिवसेनेचेच तुकडे तुकडे झाले आहेत. एक तुकडा इधर, एक तुकडा उधर आणि उद्धव ठाकरेंकडे राहिलेल्या हिश्श्यात जो तुकडा आलाय, त्यात एक डझन आमदारही दिसत नाहीयेत. आधी त्याच्याकडे बघा. १० दिवसांपूर्वीपर्यंत शिवसेनेचे आमदार म्हणायचे, आमचे नेता उद्धव ठाकरे नॉट रीचेबल आहेत. आज ठाकरेंची दयनीय अवस्था अशी आहे की एकही आमदार उद्धव ठाकरेंना रीचेबल नाहीये”, असं सोमय्या यावेळी म्हणाले.