रत्नागिरी: जयगड येथील जिंदाल कंपनीच्या एलपीजी वायू गळतीची गंभीर दखल रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. या प्रकरणी हलगर्जी करणा-या चार अधिका-यांवर गुन्हा दाखल करुन त्यांना कामावरुन निलंबीत  करण्यात आले आहे. जिंदाल कंपनीच्या  एलपीजी गॅस प्रकल्पामध्ये  यांत्रिक देखभाल दुरुस्तीचे काम सुरु असताना झालेल्या हलगर्जीपणामुळेच गॅस हवेत पसरुन नांदीवडे विद्यालयातील ५० ते ६० विद्यार्थ्यांना श्वसनाचा त्रास झाला. या प्रकाराला जबाबदार चार अधिका-यांवर रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी ठपका ठेवत जयगड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार जयगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

जयगड येथील जिंदाल कंपनीच्या परिसरात एलपीजी वायू गळती  १२ डिसेंबरला दुपारी २ च्या सुमारास ही घटना घडली.  या  वायुगळतीमुळे नजीकच्या नांदीवडे  माध्यमिक विद्यामंदिर जयगड आणि कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्रास जाणवू लागला. या वायूमुळे  मुले बेशुद्ध पडू लागली. श्वसनाचा त्रास सुरु झाल्याने मळमळ होऊन  मुले उलट्या  करु लागली होती. अशा बाधित मुलांना मिळेल त्या खाजगी गाडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर  काही मुले तेथील उर्जा आरोग्य केंद्रात भरती करण्यात आली. या प्रकाराने जयगड भागात मोठे भितिचे वातावरण पसरले असताना कंपनीने या प्रकाराबाबत  हात झटकले. मात्र स्थानिक लोकांनी राजकीय पक्षांच्या मदतीने आवाज उठवल्याने कंपनीने चार अधिका-यांचे निलंबन केले. व या प्रकाराची चौकशी सुरु केली. येथील शाळेतील मुख्याध्यापक वाघोदे यांनी तात्काळ कंपनीच्या अधिकारी आणि विद्यालय कमिटीला वायू गळतीमुळे विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाची कल्पना देवून आपल्या सहकारी शिक्षकांच्या सहाय्याने जिंदालच्या कम्युनिटी हेल्थ सेंटरला प्राथमिक उपचारासाठी हलवले. या घटनेतील ६० विद्यार्थी व एका महिलेवर उपचार करण्यात आले आहे.

ganja ulhasnagar court case
उल्हासनगर न्यायालयात चपलांच्या खोक्यातून गांजा पुरवण्याचा प्रकार; अज्ञात आरोपीचे न्यायालयाच्या खिडकीतून उडी घेत पलायन
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Mumbai Police launched drive against illegal nylon manja registering 19 cases
नायलॉन मांजाप्रकरणी मुंबईत १९ गुन्हे
Enforcement Directorate ED files Enforcement Case Information Report ECIR in Torres scam case Mumbai print news
टोरेस गैरव्यवहार प्रकरणः ईडीकडून गुन्हा दाखल, तपासाला सुरूवात; आतापर्यंत दोन हजार गुंतवणूकदांची ३७ कोटींची फसवणूक
Jaideep Apte , bail , High Court,
मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरण, जयदीप आपटे याला उच्च न्यायालयाकडून जामीन
supplementary chargesheet in Kalyaninagar accident case and chargesheet against accused in blood sample tampering case
कल्याणीनगर अपघात प्रकरणात पुरवणी आरोपपत्र, रक्ताचे नमुने बदल प्रकरणात आरोपीविरुद्ध आरोपपत्र
illegal constructions Mumbai
मुंबई : अनधिकृत बांधकामांवर २०० टक्के दंड, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांचे निर्देश
youth who attacked builder gets 10 year jail
बांधकाम व्यावसायिकावर कुऱ्हाडीने वार करणाऱ्या तरुणाला सक्तमजुरी; न्यायालयाकडून आरोपीला पाच लाखांचा दंड

हेही वाचा >>>ऐन हंगामात साखरेचे दर गडगडले; जाणून घ्या, प्रति क्विंटल दर, कारखान्यांची स्थिती

 जेएसडब्ल्यू कंपनीच्या पोर्ट विभागातील एलपीजी प्रकल्पाच्या देखभालीचे काम सुरु होते. या एलपीजी कामावर नियंत्रण असणारे अधिकारी गंगाधर बंडोपाध्याय, भाविन पटेल व  अभियंते सिध्दार्थ कोरे व दीप विटलानी यांनी योग्य ती काळजी न घेतल्याने व त्यांच्या निष्काळजीपणामुळे वायु हवेत पसरल्याने या घटनेस हेच अधिकारी व अभियंते जबाबदार असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२५, २८६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तहसीलदारांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी जिंदाल कंपनीच्या या  अधिकाऱ्यांवर जयगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच याप्रकारची दखल आमदार उदय सामंत यांनी घेऊन विद्यार्थ्यांची चौकशी केली. तसेच कंपनीच्या अधिका-यांना धारेवर धरले. जयगड परिसरातील गावातील ग्रामपंचायतींनी कंपनी विरोधात ठराव करुन जिल्हा प्रशासनाला सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा >>>Dadar Hanuman Temple : दादरमधील हनुमान मंदिर हटवण्याच्या निर्णयाबाबत मोठी माहिती, मंगलप्रभात लोढा म्हणाले…

जे एस डब्लू  कंपनीतील वायुगतीच्या प्रकाराने नांदिवडे विद्यालयातील विद्यार्थ्यांना झालेला त्रासानंतर या प्रकारची चौकशी कंपनीच्या संबंधित यंत्रणेने  केले आहे. या प्रकारात दोषी  आढळणा-यांवर कारवाई करण्यात येईल. या प्रकारच्या चौकशीचा अहवाल आल्यावरच वायु गळतीमध्ये कोणता प्रकार घडला हे समजू शकेल. तसेच कंपनीचे  पाणी समुद्रात प्रक्रिया करून सोडले जाते त्याच्यामुळे मासे मरण्याचा कोणताही प्रकार घडलेला नाही. याविषयी वेळोवेळी कंपनी काळजी घेत असल्याचे जेएसडब्लुचे संपर्क अधिकारी सुदेश  मोरे यांनी सांगितले.

जयगड येथील जिंदाल कंपनीच्या मनमानी कारभारामुळे मच्छीमारांना मोठा फटका बसला आहे. ज्या ठिकाणी जिंदाल कंपनीचे बॉयलरचे पाणी सोडले जाते त्या ठिकाणीची मासेमारी पूर्णतः नष्ट झाली आहे. या भागात मच्छीमारांना महाकूळ यासारखे मासे टनावर मिळत होते. मात्र आता या समुद्र भागामध्ये माशांचे नामोनिशाण  मिटले आहे. कंपनीने याकडे दुर्लक्ष करून मच्छीमारांचे मोठे नुकसान केले आहे. जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा ही कंपनीच्या बाजूने असल्याने कोणतीच उपाययोजना केली जात नाही. नुकत्याच झालेल्या वायू गळतीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी प्रसंग भेतला होता. यातील काही विद्यार्थ्यांना कंपनीच्या ऊर्जा या आरोग्य केंद्रामध्ये भरती करण्यात आले होते. मात्र या आरोग्य केंद्रात ऑक्सिजन व्यवस्थेबरोबर इतर कोणतेही सोयी सुविधा नसल्याने या विद्यार्थ्यांना रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालय हलवण्यात आले होते. जर ऊर्जा केंद्रामध्ये आरोग्य विषयीच्या सोयी सुविधा उपलब्ध असता तर विद्यार्थ्यांवर तात्काळ उपचार झाला असता. या सगळ्याकडे कंपनीचे अधिकारी डोळेझाक करत आहेत- शराफत गडबडे, स्थानिक मच्छिमार जयगड

Story img Loader