राज्यातील सत्ता नाट्यानंतर वाशीम-यवतमाळच्या खासदार भावना गवळींनी मंगळवारी जिल्हयात शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदारपुत्र श्रीकांत शिंदेंसहीत भाजपाचे प्रवीण दरेकर आणि इतर नेतेही उपस्थित होते. या शक्तिप्रदर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना श्रीकांत शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यावर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. विधानसभेच्या पायऱ्यांवर फिफ्टी-फिफ्टी घोषणाबाजी करत बिस्कीटचे पुडे घेऊन आंदोलनामध्ये आदित्य ठाकरे सहभागी झाल्याचा संदर्भ देत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना श्रीकांत शिंदेंनी हा टोला लगावला.

नक्की वाचा >> Monsoon Session: “मी रात्री साडेतीन वाजेपर्यंत…”; सभागृहात आमदारांसमोरच CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

भावना गवळींचं शक्तिप्रदर्शन झालं याबद्दल काय सांगाल? असं विचारण्यात आलं असतं श्रीकांत शिंदेंनी, “मला वाटतं हे शक्तीप्रदर्शन नसून लोकांचं प्रेम आहे. एवढ्या मोठ्याप्रमाणात लोकांची गर्दी जमते हे प्रेम आहे,” असं उत्तर दिलं. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी केलेल्या विधानावरुन शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला. बावनकुळेंनी सांगितलं की बुलढाणा मतदारसंघाचा पुढचा खासदार भाजपाच्या चिन्हाचा असेल. तशीच काहीशी परिस्थिती या मतदारसंघाची असेल का? हा शिवसेनेचा गड आहे, असा प्रश्न श्रीकांत शिंदेंना विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना शिवसेनेच्या बंडखोर गटातील खासदारांपैकी एक असणाऱ्या श्रीकांत यांनी, “यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र आधीच स्पष्टपणे सांगितलं आहे. जिथे जिथे शिवसेनेचे खासदार आहेत तिथे भाजपा पूर्ण ताकदीने उभी राहील आणि शिवसेनेच्या खासदारांना निवडून आणेल असं म्हटल्याचा संदर्भ दिला.

नक्की वाचा >> Shinde vs Thackeray: “मी पक्षप्रमुख असतो तर…”; लांबत चाललेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर उज्ज्वल निकम यांचं विधान

भावना गवळींना ईडी प्रकरणात क्लीन चिट मिळाली का? या प्रश्नावरही श्रीकांत शिंदेंनी भाष्य केलं. “ही गोष्ट न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयाकडून त्यांना
क्लियरन्स मिळाला असेल तर चांगली गोष्ट आहे. असं असेल तर या प्रकरणामध्ये त्यांचं काहीच नाही असं म्हणता येईल,” असं श्रीकांत शिंदे म्हणाले. तसेच पुढे बोलताना त्यांनी, “सरकारला लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम आमच्या माध्यमातून होईल. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हे सरकार पोहोचवण्याचं काम, लोकांच्या समस्या जाणून घेण्याचं काम नक्कीच केलं जाईल. जे काम अडीच वर्षांमध्ये झालं नाही ते पुढील दोन वर्षांमध्ये नक्कीच होईल,” असा विश्वास व्यक्त केला.

नक्की वाचा >> Eknath Shinde Poem on Ajit Pawar: “…आमचे मित्र अजित पवार”; सभागृहात मुख्यमंत्री शिंदेंची कविता फडणवीसांनी केली पूर्ण

आदित्य ठाकरेंनी आज विधानभवनामध्ये फिफ्टी-फिफ्टीची घोषणा दिली. बिस्कटचे पुडे दाखवून त्यांनी घोषणाबाजी केली, असा संदर्भ देत पत्रकाराने मंगळवारी झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया विचारली. याबद्दल बोलताना शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली. “मला वाटतं लोकांना आता या गोष्टींमध्ये रस राहिलेला नाही. मला वाटतं लोकांसाठी आपण काय करु शकतो हे महत्त्वाचं आहे. लोकांसाठी गेल्या अडीच वर्षांमध्ये आपण काय केलं? याचा उहापोह आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन केला पाहिजे,” असं मत श्रीकांत शिंदेंनी टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलताना नोंदवलं.

नक्की वाचा >> Thackeray vs Shinde: “मात्र त्यावेळेस जनता…”; सत्तासंघर्ष घटनापीठाकडे सोपवल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पायऱ्यांवरती फिफ्टी-फिफ्टी, गद्दार, खोके बोलून काही होणार नाही. जेव्हा आपल्याकडे अडीच वर्ष होते तेव्हा आपण महाराष्ट्रासाठी काय केलं? याचा लेखाजोखा दिला तर लोकं आपल्याला स्वीकारतील,” असंही श्रीकांत शिंदे म्हणाले.