दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली अडखळ तरीबंदर येथील मच्छिमारी जेटीवर वाहने लावण्यावरून बुधवारी सायंकाळी दोन गटात झालेल्या दगडफेकीच्या व हाणामारीच्या घटनेची  परस्पर विरोधी तक्रारी दापोली पोलीस ठाण्यात  दाखल करण्यात आली असून त्यानुसार संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  हर्णै मलखांबपेठ येथील योगेश धर्मराज चोगले यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून या तक्रारीत त्यांनी बुधवार दि.१२ रोजी सायंकाळी अडखळ तरीबंदर येथील आंजर्ले खाडीत नांगरून ठेवलेल्या मासेमारी बोटीत साठलेले पाणी काढण्यासाठी गेले असताना जेटीच्या मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या डम्पर (क्रमांक एमएच ४६ एआर ७०३०) व चारचाकी गाडी क्रमांक (एमएच ०३ सीबी २७१५) चे मोबाइलवर फोटो काढत असताना वाद झाला.

तेथे उपस्थित असलेले परशुराम दामोदर चोगले, जयेश हरेश पाटील, नितेश विजय पाटील, मयुरेश विजय पाटील, दर्शन रमेश तबीब  केदार भालचंद चोगले, अंश जनार्दन चोगले, गणेश जनार्दन चोगले, भगवान लाया चोगले, गजानन जनार्दन रघुवीर, अंकुश नरेश दोरकुळकर यांना चारचाकी गाडीमधील एका अनोळखी  इसम व माज्जम सोलकर, शाहरूक वाकणकर, निसार इस्माईल सोलकर, फरहान इमोस वाकणकर, शकूर ताहीर हाजबा, इसहाक हाजबा व त्यांचा मुलगा, अहमद हसन शिरगावकर, सैफ यासीन सोलकर, मजीद वाकणकर, अफान बागकर, बिलाल इक्बाल पटेल, मुजम्मील जैताबकर, मुबारक पटेल, फैसल, सिद्धिक, अजीम, अलतम्स  यांचेसह अन्य अनोळखी अशी ८ ते १० जणांनी लाठ्या, काठ्या व दगडाने मारहाण केल्यामुळे दुखापती झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनुसार संशयितांवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १८९(२),१९१(२),१९०,११८(१),१३१ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१),(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

तर इरफान अहमद शिरगावकर यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यात  १२ रोजी सायंकाळच्या सुमारास जेटीवर अडखळ चौफाला येथे ग्रामस्थ गाड्या लावत असलेल्या ठिकाणी संशयितांनी येवून फोटो काढत असताना फोटो का काढता असे विचारले असता मयुरेश विजय पाटील अंश जयेश चोगले, परशुराम दामू चोगले, नारायण विजय पाटील, दर्शन रमेश तबीब, ज्ञानेश्वर धर्मराज चोगले, योगेश धर्मराज चोगले, जयेश हरेश्वर पाटील, नितेश विजय पाटील, केदार भालचंद्र चोगले, गणेश जनार्दन चोगले, भगवान लाया चोगले, गजानन जनार्दन रघुवीर, अंकुश नरेश दोरकुळकर या १४ जणांसह अन्य लोकांनी बेकादेशीर जमाव करून इरफान शिरगावकर व चालक जैफ वाकणकर यांना मारहाण करून अडखळ इरफानी मोहल्ला येथे प्रवेश करून हातामध्ये लाठी घेवून दगड फेकून मारण्यास सुरुवात केली. तसेच घरावर दगड मारून नुकसान केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चारचाकी गाडी व इतर वाहनावर दगड मारून नुकसान केले. मोहल्ल्यातील माणसाना दगड मारून जखमी केल्याची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात दाखल केली असून, त्यानुसार संशयित यांचेवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १८९(२),१९१(२), १९१(३ ), १९०,११८(१),१३१ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१),(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख करत आहेत.