सोलापूर : मंगळवेढा तालुक्यातील बालाजी नगर,लमाण तांड्यावर स्थानिक आमदार विकास निधीतून उभारलेल्या सांस्कृतिक भवनात पुन्हा बेकायदा मजला बांधून हडपण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी गावच्या ग्रामसेवकाने दिलेल्या फिर्यादीनुसार श्रीकांत नंदकुमार पवार याच्या विरूध्द मंगळवेढा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. २०१५-१६ साली पंढरपूरचे तत्कालीन आमदार दिवंगत भारत भालके यांच्या प्रयत्नांनी स्थानिक आमदार विकास निधीतून सांस्कृतिक भवन उभारण्यात आले होते. परंतु या सांस्कृतिक भवनात सरकारी परवानगी न घेता बेकायदेशीरपणे दोन मजली बांधकाम करण्यात आले.

हेही वाचा >>> सातारा:अजित पवारांसह जात्यंध पक्षां बरोबर गेलेले खासदार आमदार हे देश हिताचे नव्हे -श्रीनिवास पाटील

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या बेकायदा इमारतीमध्ये श्रीकांत पवार याने माजी आमदार भारत भालके यांच्या नावाने करिअर अकादमी सुरू करून तेथे विद्यार्थ्यांना भाडेतत्वावर निवास उपलब्ध करून दिल्याचे दिसून आले,  मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या गटविकास अधिका-यांनी गेल्या २९ जानेवारी रोजी संपूर्ण इमारत कुलूप लावून लाखबंद केली होती. परंतु श्रीकांत पवार यांनी नंतर या इमारतीचे कुलूप व लाखबंद (सील) तोडून इमारत हडपल्याचे आढळून आल्याचे आढळून आले. त्यामुळे गटविकास अधिका-यांच्या आदेशानुसार ग्रामसेवक विनायक भोजने यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद नोंदवली आहे.