सातारा: जिल्ह्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीत पिकांच्या नुकसानी पोटी बाधित शेतकऱ्यांना राज्य शासनाने मदत जाहीर केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १४२ शेतकऱ्यांना तीन कोटी २३ लाख रुपयांची मदत उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यात ऑगस्टमध्ये २१.६० हेक्टर वरील शेतीचे नुकसान झाल्याचा अहवाल शासनाकडे पाठविला होता. ही भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. पैसे बँकांनी कर्ज खात्यात किंवा अन्य वसुलीसाठी वर्ग करू नयेत, असे आदेश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सर्व बँकांना दिले आहेत.
राज्य शासनाने पुणे विभागातील सातारा व सांगली जिल्ह्यात जून ते ऑगस्ट या महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती नुकसानाची भरपाई जाहीर केली आहे. पुणे विभागात सात कोटी ४८ लाख ६१ हजार रुपयांची भरपाई रक्कम मिळणार आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्याला तीन कोटी २३ लाख रुपये, सांगली जिल्ह्याला प्रथम सहा कोटी ४५ लाख ३८ हजार रुपयांची भरपाई रक्कम मिळाली आहे. सातारा जिल्ह्यातील १४२ शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली जाणार आहे. राज्यशासनाच्या निकषानुसार ही भरपाई आहे. याबाबत आदेश महाराष्ट्र महसूल व वन विभागाचे सहसचिव संपत सूर्यवंशी यांनी काढला आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांकडून ही भरपाईची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे.
सव्वातीन कोटींची मदत
साताऱ्यात जून ते ऑगस्ट या कालावधीतील अतिवृष्टीत पिकांच्या नुकसानी पोटी बाधित शेतकऱ्यांना राज्य शासनाने जिल्ह्यातील १४२ शेतकऱ्यांना तीन कोटी २३ लाख रुपयांची मदत उपलब्ध झाली आहे. शेतकऱ्यांना पीक नुकसानी पोटी पैसे बँकांनी कर्ज खात्यात किंवा अन्य वसुलीसाठी वर्ग करू नयेत असे आदेश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले आहेत.