सांगली : कोणताही कामधंदा न करता पत्नीच्या मजुरीवर जगणार्‍या मद्यपी पतीने डोकीत दगड घालून पत्नीची हत्या केल्याचा प्रकार सुसलाद (ता. जत) येथे मंगळवारी रात्री अकरा वाजणेच्या सुमारास घडला. पोलीसांनी संशयिताला अटक केली आहे.

कलाप्पा कांबळे यांने काल रात्री अकरा वाजणेच्या सुमारास पत्नी ललिता कांबळे (वय ३५) हिचा डोकीत दगड घालून खून केल्याचा  प्रकार घडला.पती पत्नीमध्ये काल रात्री किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादातच पतीने पत्नीच्या डोकीत दगड घातला. या घटनेनंतर तो घटनास्थळीच बसून होता. मृत ललिता कांबळे ही महिला दोन मुले व पतीसह सुसलाद येथे वास्तव्यास होती. पती कोणताही कामधंदा करीत नव्हता. पत्नी मात्र रोजंदारीवर जाउन कुटुंबाचा चरितार्थ चालवत होती. काल रात्री कामावरून आल्यानंतर महिला मुलांसह जेवण करून झोपली असता पती दारू पिउन घरी आला. काम धंदा न करता केवळ व्यसन करत असल्याने पतीपत्नीमध्ये किरकोळ वाद झाला. या वादातच पतीने पत्नीचा खून केला.