सोलापूर : आजारी पत्नीचा मसाज करण्यासाठी म्हणून आपल्याच कार्यालयातील सहकारी महिला चतुर्थश्रेणी कर्मचा-याला बोलावून घेतले आणि तिच्याशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग करण्याचा प्रकार सोलापूर महापालिकेतील एका आरोग्य निरीक्षकाच्या अंगलट आला. पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार संबंधित आरोग्य निरीक्षकाविरूध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखला झाला आहे. 

हेही वाचा >>> अमरावती : घरफोडीच्‍या गुन्‍ह्यातील आरोपी तरुणीवर पोलीस कर्मचाऱ्याचा बलात्‍कार

नागेश धरणे (रा. उमानगरी, जुनी मिल आवार, मुरारजी पेठ, सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या पालिका आरोग्य निरीक्षकाचे नाव आहे.  पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार पीडित महिला विवाहित असून ती पालिका आरोग्य विभागात सफाई कामगार म्हणून कार्यरत आहे. नोकरीबरोबरच ती मसाज करून उपजिविका चालविते. आरोग्य  निरीक्षक नागेश धरणे याने पीडितेला आपल्या आजारी पत्नीला मसाज करायचा असल्याचे सांगून स्वतःच्या घरी दुपारी बोलावून घेतले.

हेही वाचा >>> अकोला : उच्चशिक्षित विवाहितेने अभियंता पतीला सोडून धरला प्रियकराचा हात; १४ महिन्यांच्या चिमुकलीचाही केला नाही विचार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीडित महिला धरणे याच्याच कार्यालयात नोकरी करीत असल्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या घरी गेली. घरात धरणे याची पत्नी दिसत नसल्यामुळे पीडितेने, तुमची पत्नी कोठे आहे म्हणून विचाराणा केली, तेव्हा धरणे याने तिला सोफ्यावर बसविले आणि घरातील वृध्द आईला दुसऱ्या मजल्यावरील खोलीत सोडले. नंतर तो खाली आला. नंतर सोफ्यावर बसून त्याने पीडितेशी आश्लील चाळे सुरू केले. तेव्हा हा प्रकार सहन न झाल्याने पीडिता तेथून निसटली आणि घडलेला प्रकार आपल्या घरात पतीला सांगितला. नंतर पीडितेने फौजदार चावडी  पोलीस ठाण्यात धावा घेऊन नागेश धरणे याच्या विरूध्द फिर्याद नोंदविली.