अलिबाग : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार रविवारी कोकण किनारपट्टीवर वादळीवाऱ्यांसह अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्रात वादळसदृश्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर रायगडातील समुद्र व खाडी किनार्‍यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात देण्यात आला आहे. त्यामुुळे मच्छिमारांना खोल समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या दिलेल्या इशार्‍यानुसार रविवारी किनारपट्टीवरील भागात ताशी ४० ते ६० किमी वेगाने वारे वाहणार असल्याने समुद्र खवळलेल्या स्थितीत राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत मच्छिमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, नागरिकांनी समुद्र किनार्‍यावर पोहण्यासाठी जाऊ नये अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या असून, समुद्र व खाडी किनार्‍यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बंदर विभागाने किनारपट्टीवर धोक्याचा तीन नंबरचा बावटा जारी केल्याने मच्छीमारांना खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये तसेच जे मच्छीमार मासेमारीसाठी खोल समुद्रात केले आहेत त्यांनी तातडीने किनारपट्टीवर यावे असे आवाहन रायगडचे सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त संजय पाटील यांनी केले आहे.

शनिवारी रात्रीपासून रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात मध्यम ते जास्त स्वरूपाचा स्वरूपाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचणे वृक्ष म्हणून पडणे वीज पुरवठा खंडित होणे यासारख्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मुसळधार पावसामुळे नद्यांच्या, नाले आणि ओढे यांच्या पातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता प्रादेशिक हवामानाने विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नदीकिनाऱ्यांवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.