गडचिरोली

शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने जिल्ह्याभरात नक्षलविरोधी अभियान तीव्र केले आहे. याच अभियानांतर्गत सोमवारी पोलिसांनी नक्षलवाद्यांचा भुसूरूंग स्फोट घडवून आणण्याचा डाव उधळला. पोलीस मदत केंद्र मौजा रेगडी ते मौजा कोटमी मार्गावर सी-६० जवान रोड ओपनिंग करत होते. त्यावेळी भुसूरूंग स्फोटासाठी जमिनीत पुरून ठेवलेला १० किलो स्फोटकांचा साठा मिळाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली.

करोना टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र बंद असताना गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताहाला २८ जुलैपासून सुरूवात होत आहे. २८ जुलै ते ३ ऑगस्ट असा हा शहीद सप्ताह असतो. नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या या शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने जिल्हाभरात नक्षलविरोधी अभियान तीव्र केले आहे. त्यातच आज गडचिरोली पोलिस उपविभागांतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र रेगडी हद्दीतील मौजा रेगडी ते मौजा कोटी मार्गावर पोलीस मदत केंद्र रेगडीचे सी-६० जवान रोड ओपनिंग करत असताना नक्षलवाद्यांनी देशविघातक कृत्य व घातपाताच्या दृष्टीने लावून ठेवलेली १० किलो स्फोटके मिळाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी रेगडी केंद्राचे प्रभारी अधिकारी यांनी तात्काळ पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांना या घटनेची माहिती दिली. बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली बॉम्बशोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी अत्यंत सावधगिरी बाळगत पोलीस पथकाने नक्षलींनी लावलेले १० किलो स्फोटके निकामी केली.