सांंगली : पुण्यातील जनरल मोटार्स कंपनीच्या कर्मचार्‍यांनी मिरजेत येऊन बोंबाबोंब आंदोलन करूनही पालकमंत्री सुरेश खाडे यांनी २०० कोटींची भरपाई मिळवून दिली असून या मदतीबद्दल कामगार संघटनेने आभार मानले आहे.

मिरजेत येऊन कधी कामगार मंत्री खाडे यांच्या निवासस्थानासमोर तर कधी जनसंपर्क कार्यालयाबाहेर दोन महिन्यांपूर्वी स्थानिक राजकीय नेत्याच्या चिथावणीतून उग्र आंदोलनही केले. या प्रकरणी पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, या कामगारांना न्याय मिळावा अशीच भूमिका मंत्री खाडे यांनी घेतली होती.

हेही वाचा – …तरीही नवनीत राणा खासदार, पण रश्मी बर्वे मात्र बाद

तळेगाव दाभाडे येथील जनरल मोटर्स कंपनी ह्युंदाई कंपनीने खरेदी केली होती. यामध्ये कर्मचार्‍यांचे हित जोपासले जाईल आणि आज अखेर कामाचा योग्य मोबदला दिला जाईल, असे आश्वासन मंत्री खाडे यांनी दिले होते. मात्र कामगारांच्या विविध मागण्यांसाठी कामगार संघटनांनी आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनावरून पालकमंत्री डॉ. खाडे यांच्यावर राजकीय टीका, आरोप-प्रत्यारोपही करण्यात आले होते.

हेही वाचा – बडे नेते माझ्यासोबत असल्याने बाजू उजवी; यश निश्चितपणे मिळणार; संजय मंडलिक यांचा दावा

हेही वाचा – “नाना पटोलेंनी पैसे घेऊन डॉ. प्रशांत पडोळेंना उमेदवारी दिली,” काँग्रेसच्या माजी आमदाराचा आरोप; म्हणाले, “भाजप उमेदवाराला…”

या प्रकरणांमध्ये मध्यस्थी करत कामगारांवर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेत, पालकत्व स्वीकारून कंपन्यांशी चर्चा केली, कामगारांचा प्रश्न मार्गी लागला असून २०० कोटी रुपये नुकसान भरपाईची रक्कम ३१ मार्चपूर्वी कामगारांच्या मागणीप्रमाणे मिळणार आहे. या बद्दल कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप भेगडे यांनी एका पत्रकाद्वारे कामगार मंत्री खाडे यांचे आभार मानले आहेत.