कासचा फुलोत्सव लांबणीवर

वाई: मागील महिनाभरात कास पठारावर विश्रांती घेतलेल्या पावसाने मंगळवार रात्रीपासून हजेरी लावल्याने कास पठारावरील फुलोत्सव लांबणीवर गेला आहे. या पावसाने कास, बामणोली परिसरातील जनजीवन गारठून गेले. आज सकाळपासून येथे मुसळधार पाऊस आणि धुके होते.
मागील काही दिवसांपासून कास पठारावरील कास,बामणोली परिसरात ढगाळ हवामान आणि ऊन पावसाचा खेळ सुरू होता. दुपारनंतर पावसाची भूरपूर याने वातावरण आल्हाददायक होत होते. आज अचानक जोरदार वारा व वाढलेला पावसाचा जोर यामुळे थंडीत प्रचंड वाढ झालीय. पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वताच्या रांगांनी व्यापलेला हा परिसर अतिवृष्टीचा म्हणून ओळखला जातो. कास पठारावर फुलोत्सव सप्टेंबर महिन्यात जाहीर झाला आहे.मात्र पठारावर ऊन पडलेले नाही यामुळे फुलोत्सव लांबला होताच मात्र आजच्या पावसाने पुन्हा लांबणीवर पडला आहे.यातच माथ्यावर कायम धुक्याचे आच्छादन असल्याने याचा परिणाम माणसांबरोबर वनस्पती, पिके यावरही होवू लागलाय. या पावसानं आटलेले ओहोळ, ओढे, धबधबे पुन्हा प्रवाहित झाले असून नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे.
आताही गेली आठ दिवसांचा वेळ सोडल्यास जूनपासून उन्हे पडलेली नाहीत. त्यामुळे सगळीकडे ओलंचिंब, कोंदट,ढगाळ वातावरण, कायम धुक्याचे आच्छादन असल्याने याचा परिणाम माणसांबरोबर वनस्पती, पिके यावरही होवू लागलाय. या पावसानं आटलेले ओहोळ, ओढे, धबधबे पुन्हा प्रवाहित झाले असून नदीच्या,ओढ्याच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. .
बहुचर्चित कास पठारावरील रंगीबेरंगी फुलांचा हंगाम चालू झाला असला, तरी अद्यापही पठारावर फुलांचे गालिचे तयार झाले नाहीत. ऊन-पावसाचा खेळ चालू असेल, तर फुले लवकर फुलतात; पण पावसानं पुन्हा जोर धरल्याने कासवरील फुलांचे गालिचे होण्यासाठी वाट पहावी लागणार आहे.