ख्रिस्ती समजावरील अन्यायाविरोधात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवलं आहे. यावरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर टीका केली आहे.
आमदार नितेश राणे म्हणाले, “अन्याय कोण कोणावर करतो आहे हे माहिती घेऊन बोलले पाहीजे. हिंदूंचे फसवणुक करुन होणारं धर्मांतराला पण हा पाठींबा नाही का? असा सरसकट पाठिंबा देणे म्हणजे हिंदू समाजाचा अपमान आहे.”
याशिवाय, “पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किती हिंदू द्वेष करणार?” असा प्रश्न उपस्थित करत नितेश राणे यांनी टीकाही केली आहे. ख्रिस्ती समाजावर होणारे अन्याय रोखण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी विनंती या पत्राद्वारे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. याचबरोबर ख्रिस्ती समाजाबद्दल गैरसमज पसरवणाऱ्यांवर कारवाई करावी, असंही पत्रामध्ये त्यांनी नमूद केलं आहे.