महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक प्रचार शिगेला पोहचला आहे. गल्लीतील स्थानिक नेते ते दिल्लीतील बडे नेते यात सहभागी झाले आहेत. प्रचारसभांमध्ये या नेत्यांनी जनतेशी निगडीत महत्त्वाच्या मुद्दांना हात घालणे अपेक्षित आहे. परंतु, असे अभावानेच होताना दिसत आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडणे, बाश्कळपणा आणि एकमेकांच्या नकला करणे हेच चित्र अनेक सभांमध्ये पहायला मिळते. दरम्यान, या नेत्यांना राज्याच्या हिताच्या महत्त्वाच्या प्रश्नांची जाणीव करून देण्याची वेळ आली आहे. आणि ते काम मतदारच करू शकेल, असा आम्हाला विश्वास वाटतो. यासाठी ‘लॉकसत्ता’ने वाचकांना ऑनलाईन मंच उपलब्ध करून दिला आहे. तुमच्या दृष्टीने सर्वसामांन्यांच्या आणि राज्याच्या हिताचे महत्त्वाचे मुद्दे ‘ऑनलाईन कॉमेन्ट’ सुविधेचा वापर करून येथे नोंदवा. निवडक प्रतिक्रिया ‘लोकसत्ता’ संकेतस्थळावर आणि सोशल मिडिया पेजवर प्रसिध्द केल्या जातील.
संग्रहित लेख, दिनांक 10th Oct 2014 रोजी प्रकाशित
माझं नाव मतदार!
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक प्रचार शिगेला पोहचला आहे. गल्लीतील स्थानिक नेते ते दिल्लीतील बडे नेते यात सहभागी झाले आहेत.

First published on: 10-10-2014 at 01:38 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I am voter