अलिबाग : अलिबाग तालुक्यात १५ ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणूकीत शेकापने वर्चस्व राखले, शिवसेना आणि भाजपच्या मतविभाजनाचा फायदा शेकापच्या पथ्यावर पडला. पंधरापैकी आठ ग्रामपंचायती शेकापने जिंकल्या, तर शिवसेना शिंदे गटाचे ३, काँग्रेसचे २, राष्ट्रवादीचा एक तर एक अपक्ष सरपंच निवडून आला.

शेकापने चिंचवली, खानाव, नागाव, कामार्ले, शहाबाज, वाघ्रण, खंडाळा आणि माणकुळे या ग्रामपंचायती जिकल्या, काँग्रेसने खिडकी, आवास ग्रामपंचायती कायम राखल्या. शिवसेनेच्या शिंदे गटाने रेवदंडा, मिळकतखार आणि पेढाबे ग्रामपंचायत जिंकल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा सरपंच वाडगाव येथे निवडून आला. तर किहीम येथे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवार सरपंचपदी निवडून आला.

हेही वाचा : Petrol Diesel Price Today: आज तुमच्या शहरात पेट्रोल किती रुपये लिटर आहे? जाणून घ्या…

महायुतीत असलेल्या शिवसेना आणि भाजपचे मतविभाजन शेकापच्या पथ्यावर पडले. वाघ्रण, माणकुळे आणि खंडाळे ग्रामपंचायती सेना भाजप मतविभाजनामुळे शेकापकडे गेल्या. खानाव ग्रामपंचायत शेकापने शिवसेना शिंदे गटाकडून खेचून घेतली. त्यामुळे गेल्या विधानसभा निवडणूकीपासून अलिबाग मतदारसंघात बचावात्मक पावित्र्यात असलेल्या शेकापला नवी उमेद मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : मराठा आरक्षणाबाबत बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचं मोठं विधान; म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेकापच्या दिलीप भोईर यांना पक्षात घेऊन भाजपने मतदारसंघात पक्षाच्या मोर्चेबांधणीला सुरूवात केली होती. अलिबाग मधील आठ ग्रामपंचायती भाजपने स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला होता. याचा चांगलाच फटका शिवसेना शिंदे गटाला बसल्याचे यानिमित्ताने दिसून आले. अलिबाग तालुक्यात एकही आमदार भाजपला निवडून आणता आला नसला तरी सदस्य माणकुळे, मिळकतखार, वाघ्रण, खंडाळे, चिंचवली, किहीम, नागाव येथे त्यांचे सदस्य निवडून आले. या शिवाय रेवदंडा येथे शिवसेना शिंदे गटाशी युतीकरून भाजपने आपले सदस्य निवडून आणले आहेत. तर आगामी काळात शिवसेना शिंदे गटाला भाजपशी जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारावे लागणार आहे