बहुचर्चित मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती तलवार धारी पुतळा उभारणीच्या कामास वेग आला असून या पुतळ्याच्या चबूतऱ्याचे काम जवळ जवळ ९० टक्के पूर्ण झाले असतानाच आज नोएडा उत्तर प्रदेश येथून या पुतळा उभारणीच्या कामातील काही साहित्य आज भल्या मोठ्या ट्रकातून मालवणात दाखल झाले आहे.

आज ट्रकमधून दाखल झालेले शिवपुतळ्याच्या खालील खडकरुपी बेस आणण्यात आला आहे आज गुरुवारी दुपारी मालवणात हे पुतळ्याचे तीन बेस दाखल झाले आहे.मालवणच्या सागरी महामार्गावर अवाढव्य असणारे हे तीनही बेस उतरविण्यात आले आहेत, सहा दिवसांपूर्वी नोएडा उत्तर प्रदेश येथून श्री राम सुतार आर्ट क्रीएशन यांच्या कंपनीतून हे पार्ट आणण्यात आले आहेत ३० बाय ३० फूट लांबीचे हे पार्ट खडक रुपी असल्याची माहिती सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभाग श्री महेंद्र किणी यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मालवण राजकोट किल्ल्यावर नियोजित वेळेत हा पुतळा प्रसिद्ध चित्रकार श्री राम सुतार उभारत आहेत.