सांगली : नाट्यपंढरी सांगलीत शुक्रवारी मुहुर्तमेढ विधीने शंभराव्या नाट्यसंमेलनाचा प्रारंभ होत असून या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे स्वागताध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगितले. या सोहळ्यानिमित्त गुरुवार दि.२८ डिसेंबर रोजी सायंकाळी संगीतभूषण कै.राम मराठे फाऊंडेशन आणि कला भारती, मुंबई प्रस्तुत संगीत मंदारमाला या नाटकाचा प्रयोग होणार आहे. शुक्रवार दि.२९ रोजी सकाळी १०.३० वाजता मुहुर्तमेढीचा मुख्य सोहळा विष्णुदास भावे नाट्य मंदिर येथे होणार आहे. यावेळी प्रेमानंद गज्वी, जब्बार पटेल, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योग मंत्री उदय सामंत, पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील, सांगली, परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय गोखले, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले आदी उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा : CBSC Exam 2024: सीबीएसईच्या परीक्षांच्या तारखा जाहीर, प्रात्यक्षिक परीक्षांसाठी सूचना

Shahu Vichar Darshan Padyatra, Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj, Rajarshi Shahu Maharaj s Centenary Golden Jubilee , Centenary Golden Jubilee, Rajarshi Shahu Maharaj Kolhapur, Kolhapur, dr jai singh rao pawar,
शाहू विचार दर्शन पदयात्रेद्वारा विविधांगी कार्याचा जागर
Rashmi Thackeray in Thane for Chaitra Navratri festival
ठाण्यात चैत्र नवरात्रौत्सवासाठी रश्मी ठाकरे उपस्थिती… ठाकरे गटाचे शक्तीप्रदर्शन
sangeet natak akademi kolhapur marathi news
संगीत नाटक अकादमीच्या वतीने अंबाबाई मंदिरात बुधवार, गुरुवारी ‘शक्ती महोत्सवा’चे आयोजन
Nita ambani in paithani
Video: पैठणी, चंद्रकोर अन् मराठमोळा साज! NMACC च्या वर्षपूर्ती कार्यक्रमात नीता अंबानी मराठीत म्हणाल्या…

सदर सोहळ्यामध्ये लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासिका डॉ. तारा भवाळकर, शाहीर देवानंद माळी, ज्येष्ठ गायक पं.हृषीकेश बोडस, भाषाशास्त्राचे अभ्यासक सदानंद कदम यांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच सांगलीतील लेखक राजेंद्र पोळ यांच्या पथनाट्याच्या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. दि.२९ रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत नाटकातील नेपथ्य आणि प्रकाशयोजना- मंत्र आणि तंत्र याविषयी सुप्रसिद्ध नेपथ्य आणि प्रकाशयोजनाकार आणि अभिनेते राजन भिसे यांचे मार्गदर्शन कलाकारांना लाभणार आहे. सायंकाळी ७ वाजता ६२ व्या राज्य नाट्य स्पर्धेत सातारा-सांगली केंद्रावर प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या लोकरंगभूमी, सांगली प्रस्तुत इरफान मुजावर लिखीत आणि दिग्दर्शित ओऍसिस या नाटकाचा प्रयोग आयोजित केला आहे.