सांगली : यंदाच्या हंगामात उसाला प्रतिटन पहिली उचल साडेतीन हजार रुपये जाहीर करावी, गत वर्षी गाळप झालेल्या ऊसासाठी ४०० रुपये दुसरा हप्ता तातडीने द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सर्व कारखानदारांच्या बंगल्या समोर शुक्रवारी खर्डा भाकरी आंदोलन करण्यात आले. पहिली उचल आणि गत वर्षीचा दुसरा हप्ता न दिल्यास ऊस वाहतूक करणारी वाहने पेटवू असा इशारा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला. वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, व्यवस्थापक शरद मोरे, आरगेतील शिंदे कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे, तासगाव कारखान्याचे अध्यक्ष खासदार संजयकाका पाटील यांच्या बंगल्यावर जाऊन प्रभाकर पाटील यांना खर्डा भाकरी देण्यात आली.

हेही वाचा : पुण्यात शरद पवार अन् अजित पवार यांच्यात भेट, नेमकं कारण काय? सुप्रिया सुळे म्हणाल्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऊस वजनातील काटा मारी थांबली पाहिजे, तोडायला द्यावे लागणारे पैसे बंद झाले पाहिजेत आदींसह अन्य मागण्यांसाठी ऊसतोड बंद आंदोलन सुरू आहे. ऊस उत्पादकांची दिवाळी गोड नसेल, तर कारखानदारांचीही दिवाळी गोड होऊ देणार नाही, असा इशाराही खराडे यांनी यावेळी दिला. यावेळी संजय बेले, बाबा सांद्रे, भरत चौगुले, श्रीधर उदगावे, बाळासाहेब लिंबीकाई, दीपक मगदूम, बंडा हाबले, नंदकुमार नलवडे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.