सातारा : छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा शिलेदार आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ले सज्जनगड सोमवारी शेकडो मशालींनी उजळला. सज्जनगडावर सोमवारी दिवाळीची पहिली पहाट मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या भव्य आणि पारंपरिक मशाल महोत्सवाचे आयोजन सज्जनगड दुर्गनाद प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते.
या वेळी गडावर मावळा प्रतिष्ठानकडून साहसी खेळाबरोबरच शाहीर रंगराव पाटील (कोल्हापूर) यांचा शिवकालीन ऐतिहासिक पोवाड्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला. या वेळी सर्व भक्तांनी मिळून ‘ध्येय मंत्र’ म्हणत एकात्मतेचा संदेश दिला. यावेळी विविध जिल्ह्यांतून भाविकांनी आपली उपस्थिती दर्शवली होती.
गडाखालील भातखळे (वाहनतळ) येथून पहाटे चार वाजताच फुलांनी सजवलेल्या पालखीत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीची मिरवणूक सुरू झाली. ढोल-ताशांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात आणि रांगोळी काढलेल्या मार्गावरून ही पालखी गडावर निघाली. या वेळी पालखीचा मार्ग प्रकाशमान करण्यात आलेला होता. पालखीच्या मागे शेकडो मावळे हातात मशाली घेऊन ‘जय शिवाजी’चा जयघोष करत होते. ही पालखी गाईमुख, श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार, श्री समर्थ महाद्वार या पारंपरिक मार्गाने गडावर पोहोचली. गडावर पोहोचताच पालखी अंगलाई मंदिरात पोहोचली. या वेळी शेकडो मशालींच्या ज्योतीने तसेच फटाक्यांच्या आतषबाजीमुळे किल्ले सज्जनगडाची तटबंदी उजळली आणि खालील परळी पंचक्रोशीवर त्या प्रकाशाची झळाळी उमटली. शिवरायांच्या पवित्र भूमीवर शेकडो मशालींच्या तेजाने उजळलेला सज्जनगड पाहताना प्रत्येकाच्या मनात अभिमान आणि भावनांचा संगम दाटून आला होता. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन सज्जनगड दुर्गनाद प्रतिष्ठानकडून करण्यात आले होते.
स्वामी समर्थ रामदास समाधी मंदिर परिसरात छत्रपतींच्या पालखीचे आगमन होताच संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले. अशोक वनात मावळा प्रतिष्ठानकडून साहसी खेळाबरोबरच शाहीर रंगराव पाटील (कोल्हापूर) यांचा शिवकालीन ऐतिहासिक पोवाड्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला. या वेळी सर्व भक्तांनी मिळून ‘ध्येय मंत्र’ म्हणत एकात्मतेचा संदेश दिला. यावेळी विविध जिल्ह्यांतून भाविकांनी आपली उपस्थिती दर्शवली होती.
शिवरायांच्या पवित्र भूमीवर शेकडो मशालींच्या तेजाने उजळलेला सज्जनगड पाहताना प्रत्येकाच्या मनात अभिमान आणि भावनांचा संगम दाटून आला होता. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन सज्जनगड दुर्गनाद प्रतिष्ठानकडून करण्यात आले होते.