वाई : धनगर आरक्षणासाठी खंडाळ्यात पुणे बंगळूरू महामार्ग रोखण्यात आला आहे. पुणे आणि सातारा बाजूकडे पंधरा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वाहतूक मागील अडीच तासांपासून ठप्प आहे. धनगर आरक्षणासाठी समाजाच्यावतीने महामार्ग रोखण्याचा इशारा देण्यात आला होता. त्याप्रमाणे आज खंडाळा येथे रास्ता रोको करण्यात आला. धनगर समाजाला एसटीचे आरक्षण द्यावे या मागणीसाठी हजारो धनगर बांधव, महिला, युवक, युवती या रास्ता रोकोमध्ये सहभागी झाल्या आहेत. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या घोषणाही या वेळी देण्यात येत आहेत. महामार्ग बंद झाल्याने वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत.

आरक्षणाच्या मागणीला सध्या मोठा प्रतिसाद मिळत आहे. यासाठी चार दिवसांपूर्वी आयोजित खंडाळा तालुका बंदला मोठा प्रतिसाद मिळाला होता. खंडाळा तालुक्यातील बहुतांश गावातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. शासन दखल घेत नसल्याने समाजाच्या बांधवांनी नीरा नदीत जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला होता. आरक्षणासाठी गणेश केसकर यांच्या उपोषणाच्या तेराव्या दिवशी शासनाचा तेरावा घालण्यात आला. यानंतरही शासन लक्ष देत नसल्याने आज पुणे-बंगळूरू महामार्ग बंद करण्यात आला.

Tree cutting branches on the road negligence of Navi Mumbai Municipal Corporation
नवी मुंबई : वृक्षछाटणीच्या फांद्या रस्त्यावर, नवी मुंबई महापालिकेचे दुर्लक्ष; प्रवासी, नागरिक यांना अडथळा
Navi Mumbai Municipality, Palm Beach Road, Traffic Jams , sion panvel highway, Due to concretization, navi mumbai news, marathi news, road construction in navi mumbai,
काँक्रीटीकरणामुळे ‘पामबीच’वर वाहतूककोंडी
Mumbai Coastal Road, Cracks Appear, Controversy Over Traffic Flow, Pedestrian Walkway, bmc, hajiali Pedestrian subway, Pedestrian subway flood in mumbai,
मुंबई : सागरी किनारा मार्गावरील मार्गिकांच्या संख्येवरून नवा वाद, आरोपाचे अधिकाऱ्यांकडून खंडन
Traffic Routes Altered as Nashik s CBS to Canada Corner Road Undergoes 18 Month Concreting Work
काँक्रिटीकरणासाठी नाशिकमधील आठ रस्ते बंद – सीबीएस- कॅनडा कॉर्नर मार्गावर एकेरी वाहतूक

हेही वाचा : पंढरीच्या विठूराया चरणी ४ कोटी ७७ लाख रुपये दान! कार्तिकी यात्रेत गतवर्षीपेक्षा १.५६ कोटी रुपयांची वाढ

लोणंद येथील नगरपंचायत पटांगणावर धनगर समाजाच्या एसटी आरक्षण शिफारशीकरिता गेल्या पंधरा दिवसांपासून गणेश केसकर आमरण उपोषणाला बसले आहेत . या आंदोलनाची दखल शासन स्तरावर घेत नसल्याने धनगर समाजाने एल्गार पुकारत खंडाळा तालुका बंद व नंतर महामार्ग बंदची हाक दिली होती. केसरकर यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी शासकीय व राजकीय प्रयत्न करण्यात आले होते. पालकमंत्री शंभूराज देसाई व आमदार मकरंद पाटील यांनी त्यांची भेट घेतली होती. आजच्या रास्ता रोकोत महिला, युवक, युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महामार्गावर बकऱ्या सोडून महामार्ग अडविण्यात आला आहे. महामार्ग बंद करण्यात आल्याने सातारा, कोल्हापूर, सांगली, बंगळूरू व पुणे-मुंबईकडे जाणारा रस्ता बंद झाल्याने प्रवाशांची मोठी अडचण झाली. अनेकांनी भोर-मांढरदेव-वाई मार्गे साताऱ्याकडे जाण्यासाठी मार्ग अवलंबला. महामार्ग रोखण्यात येणार असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.