सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील दहा वर्षात झालेल्या विकास कामांच्या भांडवलावर सोलापूर लोकसभा निवडणुकीत आपण तीन लाखांचे मताधिक्य घेऊन निवडून येऊ, असा ठाम विश्वास भाजपचे उमेदवार, आमदार राम सातपुते यांनी बोलून दाखविला आहे. सोलापूर शहर जिल्हा भाजप ओबीसी आघाडीची बैठक शांतीसागर मंगल कार्यालयात झाली. त्यावेळी बोलताना आमदार राम सातपुते यांनी तीन लाख मताधिक्याने विजयी होण्याचा दावा केला. सोलापूर भाजपचा मजबूत बालेकिल्ला असून शिवाय पंतप्रधान मोदी यांचा करिष्मा कायम आहे. मतदारांमध्ये मोदींविषयी विश्वासाची भावना आहे. याच बळावर आपला विजय निश्चित असल्याचे आमदार सातपुते यांनी सांगितले.

हेही वाचा : सोलापुरात अवकाळी पावसातच प्रणिती शिंदे यांची सभा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोहोळ तालुक्यात अस्तित्वात असलेल्या भीमा परिवाराच्या बैठकीत आमदार राम सातपुते यांना समर्थन जाहीर करण्यात आले. कोल्हापुरातील खासदार धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथे भीमा सहकारी साखर कारखाना कार्यरत आहे. भीमा परिवाराच्या माध्यमातून महाडिक गट मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, माजी आमदार राजन पाटील-अनगरकर यांच्या विरोधात कार्यरत आहे. परंतु यंदाच्या लोकसभा निवडणुकीत हे परस्परांचे शत्रू महायुतीच्या माध्यमातून एकत्र आले आहेत.