भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना(ठाकरे गट) खासदार संजय राऊत, आमदार अनिल परब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांचा उल्लेख करत आता नंबर कुणाचा? हे मी नाही सांगू शकत असं म्हणत सूचक विधान केलं आहे.

किरीट सोमय्या म्हणतात, अब नंबर किसका? आता नंबर कुणाचा? एका बाजूला हसन मुश्रीफ यांनी १५६ कोटी रुपये कोल्हापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष म्हणून मागील तारखांमध्ये नोंदी केल्या, स्वत:च्याच कंपनीचे कर्ज बुडवून बुडीत खात्यात जमा केले. मुश्रीफ परिवाराची तीन मुलं जामिनासाठी धावत आहेत.

याचबरोबर, संजय राऊत यांचे भागीदार सुजीत पाटकरच्या कंपनी खात्यात मुंबई महापालिका आयुक्तांच्या परवानगीने सव्वा बत्तीस कोटी रुपये टाकले जातात. माफिया कंपनीना कोविड सेंटरचे कंत्राटं दिली जातात. त्या कंपनीच्या एका बँक खात्यात ३२.९५ कोटी रुपये येतात. २० कोटी रुपये त्यातून गायब होतात आणि ज्यांच्या खात्यात गायब होतात, तो उद्धव ठाकरेंचा उजवा हात. असंही सोमय्या यांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय, अनिल परबांच्या विरोधात आता प्राप्तिकर खात्यानेदेखील साई रिसॉर्ट जप्त केला आहे. अनिल परबांचे साई रिसॉर्ट, त्यांची जमीन प्राप्तिकर विभागाने बेनामी मालमत्ता कायद्यांतर्गत जप्त केली आहे. प्राप्तिकर विभागाने हा आदेश महाराष्ट्र सरकारला कळवला आहे. अनिल परबने अगोदर चार जामीन घेतले आहेत. अनिल परबच्याविरोधात रत्नागिरी पोलिसांनी तीन एफआयआर केले आहेत. एक भारत सरकारने तक्रार केली आहे, न्यायालयाने त्याची दखल घेऊन अनिल परबांना जामिनावर सोडलं आहे. म्हणजे अनिल परब चार गुन्ह्यांमध्ये जामीनावर आहे आणि चार गुन्हे आणखी दाखल झाले आहेत. अशी माहितीदेखील किरीट सोमय्या यांनी दिली आहे.