scorecardresearch

“जयप्रभा स्टुडिओ शूटींगसाठी खुला करा अन्यथा…”, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा इशारा

गेल्या ९४ दिवसांपासून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि कलाकारांच्या वतीनं आंदोलन सुरु आहे.

कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओ बचाव कृती समितीकडून सामुदायिक आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे. याप्रकरणी कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जयप्रभा स्टुडिओ शूटींगसाठी खुला झालाचं पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी गेल्या ९४ दिवसांपासून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि कलाकारांच्या वतीनं आंदोलन सुरु आहे. याबाबतचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

जयप्रभा स्टुडिओ शूटींगसाठी खुला झालाचं पाहिजे या प्रमुख मागणीसाठी गेल्या ९४ दिवसांपासून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि कलाकारांच्या वतीनं आंदोलन सुरु आहे. मात्र याची दखल घेतली नसल्याने आता चित्रपट महामंडळ आक्रमक झालं आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरात आंदोलनाचा धडाका सुरु करण्यात आला आहे. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकात या विरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आलं आहे. जयप्रभा स्टुडिओसाठी वेगवेगळ्या प्रकारे हे आंदोलन करण्यात येणार आहे.

‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील इंद्राची इन्स्टाग्रामवरुन एक्झिट, कारण आले समोर

जर वेळ पडली तर सामूहिक आत्मदहन करु असा इशारा चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी दिला आहे. याप्रकरणी जयप्रभा स्टुडिओ बचाव कृती समितीकडून सामुदायिक आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूरच्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी हा इशारा दिला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kolhapur jayaprabha studio should open for shooting demand from all india marathi film corporation and the artists nrp