कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओमध्ये भारतरत्न लता मंगेशकर यांचे स्मारक करण्याच्या मागणी वाढत असताना, या स्टुडिओची खरेदी स्थानिक शिवसेना नेत्याच्या मुलांसह काही बड्या व्यापाऱ्यांनी केलेली असल्याचे समोर आल्याने, आता प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. हा स्टुडिओ वाचवण्यासाठी कोल्हापूरकर आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

या पार्श्वभूमीवर जयप्रभा स्टुडिओ खरेदीदार रौनक शहा गुंदेशा आणि पोपट शहा गुंदेशा यांच्या कार्यालयावर आज(रविवार) शाई फेकून जाहीर निषेध नोंदवला गेला. तसेच, लवकरात लवकर जयप्रभा स्टुडिओ परत करावा अन्यथा यापेक्षा तीव्र स्वरूपाच आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. दरम्यान,पोलिसांनी शाईफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.

जयप्रभा स्टुडिओची ऐतिहासिक वास्तू रोनक शहा, पोपट शहा यांच्यासह इतर भागीदारांनी खरेदी केली आहे. मात्र, या स्टुडिओशी कोल्हापूरकरांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळ या ऐतिहासिक वास्तूच्या खरेदीला कोल्हापूरकरांचा विरोध होत आहे. अनेक वेळा या प्रश्नावर आंदोलने देखील झाली आहेत. तरी देखील जयप्रभा स्टुडीओची विक्री झाल्याने संतप्त कोल्हापूरकरांनी स्टुडीओची खरेदी करणाऱ्या रोनक शहा आणि पोपट शहा यांच्या भवानी मंडप परिसरातील कार्यालयावर शाईफेक केली. यावेळी आंदोलकांनी स्टुडिओ विकत घेणाऱ्या भागीदारांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे भवानी मंडप परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना ताब्यात घेत. कार्यकर्त्यांवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या आंदोलनामध्ये दिलीप पाटील , रुपेश पाटील, निलेश सुतार, सचिन चौगुले, भगवान कोईगडे, रणजीत देवने अभिजित भोसले, नवीन पाटील आदी सहभागी झाले होते.

लता मंगेशकर यांचे स्मारक जयप्रभा स्टुडिओत करण्यावरून कोल्हापुरातील वातावरण तापले!

तर, दुसरीकडे जयप्रभा स्टुडिओ वाचवण्याच्या मागणीसाठी आजपासून स्टुडिओच्या दारात अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्यावतीने बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. तसेच, कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीनेही स्टुडिओ ताब्यात घेऊन कोल्हापूरचे वैभव जतन करण्याची मागणीही केली आहे.

जयप्रभा स्टुडिओ कलाकारांसाठीचं राहिला पाहिजे.. यासाठी प्रसंगी झोळी घेऊन कोल्हापुरातून भीक मागू…अशी भावना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि कोल्हापुरातील नागरिकांनी आजच्या साखळी उपोषणावेळी व्यक्त केली… जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत… जयप्रभा स्टुडिओ पुन्हा सुरू होणार नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय देखील घेण्यात आला.

Jayaprabha Studio : “…तर मी राजकीय संन्यास घेईन ; आमचं चुकलं असेल तर आम्हाला फासावर द्या ”

कोल्हापूरची अस्मिता आणि भालजी पेंढारकर यांच्या कार्याची एकमेव आठवण असलेल्या जयप्रभा स्टुडिओची विक्री 2 वर्षापूर्वीच झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. या स्टुडिओची खरेदी शहराचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मुलांसह काही बड्या व्यापाऱ्यांनी केल्याने आता या प्रकरणामुळ कोल्हापुरातील वातावरण चांगलेचं तापले आहे. शनिवारी दिवसभर शहरात जयप्रभाच्या विक्री विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. आजपासून जयप्रभा स्टुडीओ समोर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्यावतीन साखळी उपोषणाला सुरवात करण्यात आली. जो पर्यंत स्टुडिओची जागा परत मिळत नाही आणि याठिकाणी सिनेमाचे शूटिंग सुरू होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूचं राहणार असल्याचे कलाकारांनी सांगितले. आजपासून सुरु झालेल्या उपोषणात अनेक संघटनांनी, कोल्हापूरातील कृती समिती आणि माजी नगरसेवकांनी सहभागी होत पाठिंबा दिला. जयप्रभा स्टुडिओ ही आमची अस्मिता असून हा स्टुडीओ जो पर्यंत कलाकारासाठी खुला होत नाही तो पर्यंत चित्रपट महामंडळाचा लढा सुरुच राहणार असल्याचे यावेळी कलाकारांनी सांगितले. तर माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मुलांचा यामध्ये सहभाग असल्याने याविरोधातही तीव्र भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान आजच्या उपोषणामध्ये माजी नगरसेवक देखील सहभागी झाले होते. श्री महालक्ष्मी स्टुडिओ एलएलपीने ही जागा खरेदी केली असली तरी विना अट त्यांनी ही जागा सोडावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. तर माजी आमदार क्षीरसागर यांनी याबाबत मोठ मन करावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. साखळी उपोषणामध्ये अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, सहखजिनदार शरद चव्हाण, संचालक सतीश बिडकर, रणजीत जाधव, रवि गावडे, माजी नगरसेविका सुरेखा शहा, यांच्यासह कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीचे सदस्य, माजी नगरसेवक, कलाकार सहभागी होते.