राहाता : शनिवारी सकाळी शाळेत जाणाऱ्या ९ वीतील विबिबट्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढत असून डिग्रस येथे आज,द्यार्थिनीवर बिबट्याने केला. या प्राणघातक हल्ल्यात ती जखमी झाली. तिच्यावर संगमनेर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून मुलीची प्रकृती स्थिर आहे.

प्रगती सखाराम श्रीराम असे जखमी मुलीचे नाव आहे. ती डिग्रस येथील विद्यालयात शिकते. प्रगती आज सकाळी ७.१५ च्या सुमारास शाळेत जात होती. लिंब फाटा येथे ती आली असता, झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने प्रगतीवर हल्ला केला. त्यामुळे प्रगती मोठ्याने ओरडल्याने रस्त्याने येत असलेले देवराम तुळाजी खेमनर यांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रगतीला बिबट्याच्या तावडीतून सोडवले. स्थानिकांच्या मदतीने प्रगतीला संगमनेर शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

प्रगतीच्या गळ्याला आणि मानेला गंभीर दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच गट शिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड, शिक्षण विस्तार अधिकारी मंगला कलगुंडे – हिरगळ, केंद्रप्रमुख बाळासाहेब जाधव, सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे सचिव जानकीराम पुणेकर, मुख्याध्यापक बाचकर, शेख, शिक्षक श्रीपाद पांढरे आदींनी रुग्णालयात जाऊन प्रगतीच्या प्रकृतीची माहिती घेतली.

वनविभागाने घटनास्थळी धाव घेत बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला आहे. मागील आठवड्यातही याच परिसरात बिबट्याचे दर्शन झाले होते. आता पुन्हा त्याच ठिकाणी बिबट्याने मुलीवर हल्ला केल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.