Maharashtra Breaking News Updates, 24 September 2022 : उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाला मुंबईतील शिवाजी मैदानावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिल्यामुळे शिंदे गटातील नेते आणि उद्धव ठाकरे समर्थक एकमेकांविरोधात टीका करत आहेत. शिंदे गट मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी अमित शाहा यांची भेट घेतल्यामुळे अनेक तर्क लावले जात आहेत. दुसरीकडे राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय तपास यंत्रणा ( एनआयए ) आणि अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) देशातील वेगवेगळ्या राज्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) विरोधात दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली कारवाई केली आहे. पुण्यातील कोंढवा भागातही पीएफआय संघटनेच्या मुख्य कार्यालयावर एनआयए, एटीएस,जीएसटी तपास यंत्रणांमार्फत २२ सप्टेंबर रोजी छापा टाकण्यात आला. त्यानंतर येथे पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा दावा केला जातोय. या घडामोडींसह राज्य, देश तसेच जगभरातील घडामोडींचा आढावा एका क्लिकवर