Marathi News Today : राज्याच्या सत्तासंघर्षावरील निकाल लागल्यानंतर आता आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आला आहे. यावर ठाकरे गट आणि शिंदे गटातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. अशातच दोन दिवसांपूर्वी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. कर्नाटकच्या जनतेनं काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिलं आहे. परंतु मुख्यमंत्रीपद कोणाला द्यायचं हा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठी अद्याप घेऊ शकले नाहीत. आज (१५ मे) दिवसभरात याविषयीच्या बातम्या पाहायला मिळतील.
Maharashtra Breaking News Live Update Today : राज्यासह देशातल्या महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर
पुणे: केंद्र सरकारने स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचे पाऊल उचलले आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून ‘वन नेशन, वन प्रॉडक्ट’ म्हणजेच एक स्थानक, एक उत्पादन योजना राबवली जात आहेत.
अंबरनाथः गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथ शहरातील पाणी प्रश्न गंभीर होत असून स्थानिक लोकप्रतिनिधी आणि खुद्द सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी वारंवार मागणी करूनही मुबलक पाणी पुरवठा होत नसल्याचे समोर आले आहे.
ठाणे : ठाणे, कळवा आणि मुंब्रा भागातील चांगल्या रस्त्यांवर नवीन डांबर टाकायचे आणि करोडो रुपयांची बिले काढायात येत असून यात खालपासून ते वरपर्यंत सगळ्यांचेच हात आहेत, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी समाजमाध्यमांद्वारे केला आहे.
पुणे : ‘डीआरडीओ’चे संचालक डाॅ. प्रदीप कुरुलकरांप्रमाणे हवाई दलातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने मोहजालात (हनी ट्रॅप) अडकविण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती राज्य दहशतवाद विरोधी पथकाने सोमवारी विशेष न्यायालयात दिली.
कल्याण: कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील सार्वजनिक स्वच्छतेची कामे नियमित झाली पाहिजेत म्हणून आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी दोन महिन्यापूर्वी पालिकेच्या २५ विभागांमध्ये अनेक वर्ष शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या १५६ सफाई कामगारांच्या घनकचरा विभागात बदल्या केल्या.
कल्याण : पावसाळा तोंडावर आला तरी कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील नाले, गटार सफाईची कामे सुरू झाली नसल्याने जागोजागीचे नाले, गटारे कचरा, गाळाने तुडुंब भरले आहेत. नाले, गटारांमधील कचरा वेळीच काढला नाही तर शहर जलमय होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
नागपूर: नागपूरहून पुण्यासाठी निघालेल्या विमानाला पक्षी धडकला. परंतु वैमानिकाने तातडीने विमान उतरवल्याने मोठी दुर्घटना टळली.
१६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय तातडीने घेतला जावा या अनुषंगाने ठाकरे गटाने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना ठाकरे गटाने या संदर्भातलं पत्र दिलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे विदेश दौऱ्यावर असल्याने ठाकरे गटाने नरहरी झिरवळ यांना पत्र दिलं आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल नुकताच लागला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील असं म्हटलं होतं. त्यामुळे ठाकरे गटाने या हालचाली सुरु केल्या आहेत.
अमरावती: विद्यार्थ्यांच्या आधार प्रमाणीकरणानुसारच पटसंख्या निश्चित करून २०२२-२३ ची संचमान्यता अंतिम करण्याचे शासनादेश आहेत.
नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलेल्या नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसला पुरेसे प्रवासी मिळत नसल्याने या गाडीऐवजी तुलनेने निम्न दर्जाची तेजस एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निर्णय दिला आहे. न्यायालयाने शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या पात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिला आहे. राहुल नार्वेकर हे लंडन दौऱ्यावरून नुकतेच मुंबई विमानतळावर दाखल झाले. यावेळी विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नार्वेकरांनी मोठं वक्तव्य केलं. नार्वेकर म्हणाले, लवकरात लवकर निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न असेल. ही एक मोठी प्रक्रिया आहे. यामध्ये सर्वप्रथम राजकीय पक्ष कुणाचा आहे? याचा निर्णय होणं आवश्यक आहे. संपूर्ण तपास पूर्ण झाल्यानंतरच हा निर्णय घेण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्यामुळे घटनेतील सर्व तरतुदींचा विचार करूनच योग्य निर्णय घेऊ…”
मविआतील पक्षांमध्ये जागावाटपावर चर्चा करण्यासाठी समितीची स्थापना केली जाईल, असं अजित पवार यावेळी म्हणाले. “जागावाटप समितीसाठी तिन्ही पक्षं काही नावं देतील. मग ते लोक बसून विचार करतील. दोन दोन नावं तिन्ही पक्ष देतील. मग हे ६ लोक बसून जागावाटपाची चर्चा करतील”, असं अजित पवार म्हणाले.
“फक्त तीन पक्ष नाही, पण या तीन पक्षांशी संबंधित मित्रपक्ष, भलेही ते आमदारांच्या संख्येनं लहान असतील, त्यांनाही बरोबर घ्यावं असं अनेकांनी आम्हाला म्हटलं होतं. त्यामुळे त्यांच्या बाबतही चर्चा झाली”, असंही अजित पवारांनी नमूद केलं.
पुणे: जगभरात युद्धप्रकारामध्ये बदल होत आहेत. पारंपरिक युद्धप्रकाराबरोबर नव्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. पृष्ठभाग आणि हवाई युद्धाबरोबर सायबर आणि अवकाश क्षेत्रात आव्हाने निर्माण झाली आहेत.
बुलढाणा : विद्युत खांबावर दुरुस्तीचे काम करीत असताना उच्च दाबाचा विद्युत धक्का लागून युवकाचा मृत्यू झाला. यामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील केडमारा जंगल परिसरात ३० एप्रिल रोजी झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत कुख्यात नक्षलवादी बीटलू मडावीसह तिघांना ठार करण्यात पोलिसांना यश आले होते. याविरोधात नक्षल्यांनी बंदचे आवाहन केले असून भामरागड मार्गावर आज काही पत्रके आढळून आली.
पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. पक्षाचे माजी आमदार आणि पुरंदरमधील महत्त्वाचे नेते अशोक टेकवडे यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपामध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात पुरंदरमधली मतं महत्त्वाची ठरतात. गेल्या लोकसभा निवडणुकीतही पुरंदर विधानसभा मतदारसंघातली मतं सुप्रिया सुळेंसाठी महत्त्वाची ठरली होती. त्यामुळे हा खासदार सुप्रिया सुळेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिरात दुसऱ्या धर्माच्या गटाने प्रवेशाची मागणी केल्यावरून निर्माण झालेल्या वादात पोलिसांनी हस्तक्षेप करीत दोन्ही गटांना समज देत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी पुरोहित संघाने केली आहे.
बुलढाणा: अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आलेल्या राधिका विलास इंगळे या बालिकेच्या हत्येचा उलगडा व मारेकऱ्याचा तपास लागत नसल्याने चिखलीतील नागरिकांत संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे.
नाशिक – सार्वजनिक ठिकाणी रंगमंचावर सादर होणाऱ्या प्रयोगाच्या संहितांचे पूर्व परिक्षण करण्यासाठी राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने जाहीर केलेल्या सेन्सॉर बोर्डाच्या यादीत नाशिकचे ज्येष्ठ लेखक विवेक गरुड यांची निवड झाली आहे. नाशिकमधून निवड झालेले ते एकमेव रंगकर्मी आहेत.
ठाणे : नौपाडा येथील भास्कर कॉलनीमधील अमर टॉवरच्या पहिल्या मजल्यावरील एका खोलीचा स्लॅब सोमवारी सकाळी कोसळला. या खोलीत अडकलेल्या पाच व्यक्तींना पालिकेच्या पथकाने बाहेर काढले. यातील तीनजण जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अकोला : शहरात दंगल उसळल्याने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या शहरातील केंद्रावर १५ मे रोजी होणाऱ्या दोन्ही शिफ्टमधील परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
गोंदिया : भारतीय स्वातंत्र्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेतून, कवी नामदेव ढसाळांनी विविध कवितेतून समतेची मांडणी केली. परंतु भारतीय राज्यघटनेला अपेक्षित असं घडलं नाही. परिणामी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी काळापर्यंत अजूनही साहित्यिकांना समतेच्या कविता लिहाव्या लागतात हे देशाचं फार मोठे दुर्दैव आहे, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी बोलून दाखविली.
डोंबिवली: ठाकुर्ली जवळील खंबाळपाडा येथील तलावातील पाणी कडक उन्हामुळे आटले आहे. या तलावातील मासे मरण पावले आहेत.
नाशिक – महानगरपालिकेतील अधिकारी-कर्मचारी दिवसातील कित्येक तास कार्यालयातून अंतर्धान पावत असल्याच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन आता संबंधितांची दैनंदिन उपस्थिती आणि कामकाजावर इ हालचाल (मुव्हमेंट) कार्यप्रणालीद्वारे लक्ष दिले जाणार आहे. या प्रणालीची सोमवारपासून काटेकोरपणे अमलबजावणी करण्याचे निर्देश प्रभारी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत.
डोंबिवली: नव्यानेच उभारण्यात आलेल्या डोंबिवलीतील शीळ रस्त्यावरील गोळवली येथील रिजन्सी अनंतम या सुमारे चार हजार लोकांची वस्ती असलेल्या गृहसंकुलात मागील पाच दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट असल्याने रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्याशीसंबंधी मोठी बातमी समोर येत आहे. आर्थिक अन्वेषण विभागाने (सीबीआय) समीर वानखेडे यांच्या मुंबईतील घरावर छापेमारी केली होती. तसेच, सीबीआयने भ्रष्टाचारप्रकरणी समीर वानखेडे यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला होता. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सीबीआयने आता एफआयआरमध्ये मोठा खुलासा केला आहे. सविस्तर वृत्त वाचा
डोंबिवली – मागील काही दिवसांपासून डोंबिवली पूर्वेतील विविध भागात संध्याकाळी, रात्री उशिरा अचानक वीज पुरवठा खंडित होत आहे. वीज भारनियमनाची महावितरणकडून कोणतीही पूर्वसूचना नसताना रात्रीच्या वेळेत अचानक वीज पुरवठा बंद होत असल्याने अगोदरच दिवसाच्या उकाड्याने हैराण नागरिकांची रात्रीच्या वेळेत तलखी होत आहे.
ठाणे जितेंद्र आव्हाड यांचे खाजगी स्वीय सहाय्यक अभिजीत पवार यांना पाच जिल्ह्यांमधून तडीपार करण्यात आले आहे. अभिजीत पवार यांच्यावर विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याने त्यांना तडीपार करण्यात आल्याचे ठाणे पोलिसांचे म्हणणे आहे.
अमरावती: वरुड तालुक्यातील एकलविहीर गावातील एका विहिरीत एक अनोळखी मृतदेह आढळून आला आहे. या मृतदेहाला शीर आणि हात नाही.
कर्नाटकात भाजपाचा दारुण पराभव झाल्यानंतर विरोधकांनी जल्लोष केला. तसंच, हा विजय काँग्रेसचा नसून विरोधकांचा असल्याचंही संजय राऊत म्हणाले होते. यावरून भाजपा नेते नितेश राणे यांनी राऊतांवर टीका केली आहे. तसंच, नाना पटोलेंनाही प्रश्न विचारला आहे. नितेश राणे आज माध्यमांशी बोलत होते. सविस्तर बातमी वाचा
महाराष्ट्राप्रमाणे एखादा पहाटेचा शपथविधी घडवून..., कर्नाटक निकालावरून ठाकरे गटाने भाजपाची कुवतच काढली
ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून ठाकरे गटाने कर्नाटक भाजपावर टीका केली आहे. सामनाच्या आजच्या (१५ मे) अग्रलेखात म्हटलं आहे की, “कर्नाटकचे चित्र कधी नव्हे इतके स्पष्ट झाले आहे. काँग्रेसचे बहुमत इतके पक्के आहे की, भारतीय जनता पक्ष तेथे फोडाफोडी करून सत्ता काबीज करण्याचे स्वप्नदेखील आता पाहू शकत नाही. महाराष्ट्राप्रमाणे एखादा पहाटेचा शपथविधी घडवून आणण्याची कुवतही कर्नाटकातील भाजपात नाही. भारतीय जनता पक्षाचे विद्यमान अध्यक्ष नड्डा यांना पराभवामागून पराभवाचे धक्के बसत आहेत व त्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे. कर्नाटकात भाजपने विजय मिळवला असता तर त्याचे श्रेय मोदी यांनीच घेतले असते, पण पराभवाचे मडके फोडण्यासाठी बिच्चारे नड्डा यांचे डोके आहे”, अशी खोचक टीकाही करण्यात आली आहे.