पीछेहाट दिसताच बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा काढता पाय

पालघर : पालघर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या राजेंद्र गावित यांनी बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांच्याविरुद्ध सुमारे ८८ हजारांहून अधिक मतांची आघाडी मिळविल्याने युतीच्या कार्यकर्त्यांत उत्साह संचारला, तर बहुजन विकास आघाडीचे प्राबल्य असलेल्या क्षेत्रांत सर्वत्र शुकशुकाट होता. मतमोजणी प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू राहिल्याने निकालाची अंतिम आकडेवारीच्या प्रतीक्षेत उमदेवार आणि त्यांचे प्रतिनिधी ताटकळत होते.

पालघर लोकसभा जागेसाठी मतमोजणीला आज सकाळी ८ वाजता प्रारंभ झाला. आरंभी काहीशा संथ गतीने सुरू असलेल्या मतमोजणी काही तासांनी वेळ घेतला.

सुरुवातीच्या काही मतमोजणीच्या फेऱ्यांमध्ये शिवसेना आणि बहुजन विकास आघाडीचे उमेदवार यांच्यामध्ये अटीतटीची लढत सुरू होती. दुपारी १२ वाजेपर्यंत राजेंद्र गावित यांनी बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारावर २० हजार मतांची आघाडी मिळविल्यानंतर शिवसेना आणि भाजपाचे कार्यकर्ते पालघर शहरांमध्ये एकत्र होऊ लागले.

शिवसेनेच्या उमेदवाराने आगामी फेऱ्यांमध्ये मताधिक्य कायम ठेवले. मताधिक्य ९५ हजारांच्या पुढे काही काळासाठी गेले होते. नालासोपारा आणि बोईसर या बहुजन विकास आघाडीच्या प्राबल्य असलेल्या दोन मतदारसंघांमध्ये बहुजन विकास आघाडीचे होणारी पीछेहाट पाहता दुपारीच बहुजन विकास आघाडीचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रातून काढता पाय घेतला.

दुपारी २ वाजेपर्यंत शिवसेनेच्या उमेदवारांनी विजयी मताधिक्य घेतल्याची खात्री झाल्यानंतर गावित हे मतमोजणी केंद्रावर दाखल झाले. पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना सोबत मतदान केंद्राच्या बाहेर जमलेल्या शिवसेना-भाजप व श्रमजीवी कार्यकर्त्यांच्या सोबत जल्लोषामध्ये सहभागी झाले. या वेळी राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र फाटक तसेच युतीच्या प्रमुख घटक पक्षांचे वरिष्ठ पदाधिकारी सहभागी झाले होते.

एकीकडे विजय साजरा करण्यासाठी युतीचे कार्यकर्ते एकत्र होत असताना बहुजन विकास आघाडीचे प्राबल्य असलेल्या विरार-वसई महानगरपालिका क्षेत्र तसेच बोईसर मतदारसंघातील काही गावांमध्ये निकालाचा तपशील पुढे येताच शुकशुकाट पसरला होता. या विजयाबद्दल शिवसेनेच्या नेत्यांनी आपल्या पक्षाच्या वरिष्ठांचे, कार्यकर्त्यांना व मतदारांना आभार मानले.

मतदान केंद्राबाहेर गर्दी

पालघरच्या शासकीय गोडाऊनमध्ये सुरू झालेल्या मतमोजणीनंतर दुपापर्यंत मतमोजणी केंद्राबाहेर राजेंद्र गावित यांच्या विजयाची चाहूल लागताच शिवसेना-भाजप तसेच श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांची गर्दी होऊ  लागली. राजेंद्र गावित यांचा विजय निश्चित झाल्यानंतर संपूर्ण परिसर भगवामय झाला व कार्यकर्त्यांनी जल्लोषात विजय साजरा केला. मंत्री  एकनाथ शिंदे पालघरमध्ये दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष व उत्साह वाढला व याप्रसंगी फटाके फोडण्यात तसेच मिष्ठान्न कार्यकर्त्यांनी एकमेकांना भरविले.

विकास आघाडीचा काढता पाय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेनेच्या उमेदवाराने आगामी फेऱ्यांमध्ये मताधिक्य कायम ठेवले. मताधिक्य ९५ हजारांच्या पुढे काही काळासाठी गेले होते. नालासोपारा आणि बोईसर या बहुजन विकास आघाडीच्या प्राबल्य असलेल्या दोन मतदारसंघांमध्ये बहुजन विकास आघाडीचे होणारी पीछेहाट पाहता दुपारीच बहुजन विकास आघाडीचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रातून काढता पाय घेतला.