Maharashtra Assembly Monsoon Session Highlights: सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विविध मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी ते शक्तीपीठ महामार्ग यासह आदी महत्वाच्या विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. यातच आगामी महापालिका निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात ५ जुलै रोजी झालेल्या विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी याबाबतचे संकेत देखील दिले आहेत. मात्र, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र मेळाव्यानंतर त्यांच्यावर भारतीय जनता पार्टीचे नेते टीका करताना दिसून येत आहेत. या बरोबरच राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान, विधिमंडळ अधिवेशनातील सर्व घडामोडींसह राज्यातील राजकीय व इतर घडामोडींचा आढावा आपण या लाइव्ह ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
Latest Maharashtra News Live Today : अधिवेशनातील सर्व घडामोडी व इतर राजकीय घडामोडींचा आढावा आपण या लाइव्ह ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
"असे काही लकडबघ्घे आहेत. लकडबघ्घा म्हणजे तरस. असे काही लोक आहेत जे आपण आनंदात असताना त्यात आग लावण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांना मी सांगेन की तुम्ही काहीही म्हणा. तुम्हाला इथे कुणी ओळखत नाही. असे जे कुणी आहेत, खरंतर मी तरसाची माफी मागतो. हे त्याही लायकीचे नाहीत. काड्या घालणं हा यांचा उद्योगच आहे. इकडे येऊन त्यांनी बघावं की आमचा कोणत्याही भाषेला विरोध नसून भाषेच्या सक्तीला विरोध आहे. त्यामुळे तुम्ही उगीच भाषिक वाद इकडे करू नका. आमच्याकडे सगळे आनंदाने राहात आहेत. शिवसेना व शिवसैनिक हे रक्तदान, रुग्णवाहिका सेवा यासाठी जात-पात-धर्म न बघता या गोष्टी करत आलो आहोत. हे बाहेरचे लोक इथे आग लावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी त्यांचं घर बघावं. त्यांचा मेलेला पक्ष जिवंत होतोय का ते बघावं", अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपा खासदार निशिकांत दुबेंवर केली आहे.
"ना नोंदणीकृत कंपनी, ना आयटीआर, तरी मंत्री शिरसाटांच्या मुलाला कंत्राट", विरोधकांचा संताप; सभागृहात राडा
स्वत: मंत्री असूनही नरहरी झिरवळ समोरच्या आमदारालाच दोनदा मंत्री म्हणाले, विधानसभेत एकच हशा! नेमकं काय घडलं?
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळते. पण आरोप-प्रत्यारोपांमुळे जसं वातावरण तापतं, तसंच सदस्यांमध्ये होणाऱ्या मिश्किल टिप्पण्यांमुळे ते हलकं-फुलकंही होतं. असाच काहीसा प्रकार आज विधिमंडळ अधिवेशनादरम्यान विधानसभेत घडला. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या अशाच मिश्किल स्वभावासाठी परिचित आहेत. त्यांनी सभागृहात प्रश्न विचारणाऱ्या आमदारालाच दोनदा ‘मंत्री महोदय’ म्हटल्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला!
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी म्हटलं की, "तुम्ही काय म्हणता की मराठी बोलावं लागेल? तुम्ही कोणाची भाकरी खाता? येथे टाटा, बिर्ला, रिलायन्स असले, टाटांनी तर पहिली फॅक्टरी बिहारमध्ये बनवली. मग तुम्ही कोणता टॅक्स भरत आहात? तुमच्या जवळ कोणती फॅक्टरी आहे? तुम्ही आमच्या पैशांवर जगत आहात. सर्व इंडस्ट्री गुजरातमध्ये येत आहे. तर तुमच्यात जास्त हिंमत असेल तर उर्दू भाषकिांनाही मारहाण करून दाखवा", असं आव्हान निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना दिलं आहे. ते एएनआयशी बोलत होते.
#watch | Guwahati, Assam | On Raj Thackeray's remark 'beat but don't make a video', BJP MP Nishikant Dubey says, "...You people are surviving on our money. What kind of industries do you have?... If you are courageous enough and beat those who speak Hindi, then you should beat… pic.twitter.com/gRvAjtD0iW
— ANI (@ANI) July 7, 2025
अशोक सराफ यांचं वक्तव्य; “एकनाथ शिंदे म्हणजे विलक्षण कलाप्रेमी माणूस, त्यांनी…”
Ashok Saraf एकनाथ शिंदे म्हणजे विलक्षण कलाप्रेमी माणूस असं म्हणत अभिनेते अशोक सराफ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं. मराठी नाट्य परिषद, नवी मुंबई शाखा आणि बाल रंगभूमी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘कलासेवक’ सन्मान सोहळ्यात अशोक सराफ यांनी हे वक्तव्य केलं. या कार्यक्रमात पद्मश्री पुरस्कार विजेते अभिनेते, महाराष्ट्रभूषण अशोक सराफ आणि प्रख्यात सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव यांचा विशेष सन्मान करून त्यांना गौरविण्यात आलं. यावेळी मनोगत व्यक्त करताना अशोक सराफ यांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं.
Thackeray Brothers Alliance: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे महाराष्ट्रात नेमकं काय घडणार? शिंदेंना फटका, भाजपाला आव्हान की काँग्रेसची पंचाईत?
प्रिया फुके यांचे विधानभवनासमोर आंदोलन, आमदार परिणय फुके यांच्यावर केले गंभीर आरोप
भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद सदस्य परिणय फुके यांच्या घरातील वाद चव्हाट्यावर आला आहे. काही दिवसांपूर्वी प्रिया फुके यांनी पत्रकार परिषद घेत आमदार परिणय फुके यांच्या कुटुंबियावर गंभीर आरोप केले होते. यानंतर आता प्रिया फुके यांनी विधानभवनासमोर आंदोलन केलं आहे. तसेच यावेळी प्रिया फुके यांनी आमदार परिणय फुके यांच्यासह त्यांच्या कुटुंबियावर गंभीर आरोप केले आहेत.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधकांचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधकांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. वीज बिल सवलतीच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता; “तिसरं महायुद्ध कुठल्याही क्षणी पेटू शकतं कारण….”
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुस्तक प्रकाशनाच्या एका कार्यक्रमात बोलत असताना तिसऱ्या महायुद्धाची शक्यता व्यक्त केली आहे. जगात जी परिस्थिती आहे ती पाहता तिसरं महायुद्ध कधीही पेटू शकतं असं म्हणत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. इराण, इराक आणि इस्रायल युद्ध, रशिया आणि युक्रेन यांचं युद्ध यामुळे जगातल्या घडामोडी कशा बदलल्या आहेत यावरही नितीन गडकरींनी भाष्य केलं आहे.
तब्बल १३ तासांनी वाशी-पनवेल लोकल सुरू, मात्र कूर्मगतीने
हार्बर मार्गावरील वाशी ते पनवेल दरम्यानची लोकल सेवा तांत्रिक बिघाड झाल्याने तब्बल १३ तासांहून अधिक काळ बंद होती. त्यानंतर हार्बर मार्गावरील हजारो प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. रविवारी दुपारी ४:३० च्या सुमारास झालेल्या या व्यत्ययामुळे वाशी, बेलापूर, नेरुळ आणि पनवेल सारख्या प्रमुख स्थानकांवर अनेक प्रवासी अडकून पडले होते. आज सकाळी ६.०९ वाजता दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर वाशी-पनवेल लोकल सुरू झाली. मात्र, गाड्या २० ते ३० मिनिटे उशिराने धावत आहेत.
“आपल्या घरात कुत्राही वाघ असतो, हिंमत असेल तर…”, भाजपा खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य; परप्रांतीयांवरून ठाकरे बंधूंना डिवचलं
मुंबईतील मीरा रोड परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका व्यापाऱ्याला मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. संबंधित व्यापारी मराठीत बोलला नाही, म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) सात कार्यकर्त्यांवर गुन्हा देखील दाखल केला आहे. मात्र, या प्रकरणानंतर भाजपा आणि मनसेच्या नेत्यांमध्ये जोरादार आरोप-प्रत्यारोप करत वाद रंगल्याचं पाहायला मिळालं. मराठी भाषा न बोलणाऱ्या परप्रांतीयांना मनसेकडून मारहाणीच्या घटनेनंतर आता भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी प्रतिक्रिया देत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. तसेच दुबे यांनी परप्रांतीयांवरून ठाकरे बंधूंना एक प्रकारे आव्हान देत डिवचलं आहे. निशिकांत दुबे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये कुत्रा असा शब्द संबोधल्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
'दहशतवाद्यांशी तुलना मराठी माणसांशी करणं खपवून घेणार नाही', रोहित पवारांचा इशारा
"मी विनंती करतो की नेत्याचं आणि तुमच्या पक्षाचं किती ऐकायचं आणि कितीपर्यंत ऐकायचं हे समजून घेऊन पुढील राजकीय वाटचाल करावी. दहशतवाद्यांशी तुलना मराठी माणसांशी करणं आम्ही खपवून घेणार नाही. आशिष शेलार यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. तसेच आगामी महापालिका निवडणुका आल्यामुळे मराठी विरुद्ध परप्रांतीय असं सुरु आहे", असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विविध मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत., (फोटो-संग्रहित छायाचित्र)