Maharashtra Monsoon Session 2025 Updates, 15 July : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (उबाठा) व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची चर्चा चालू आहे. मात्र, युतीचा निर्णय निवडणुकीवेळी घेतला जाईल, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच मनसे व शिवसेनेने (ठाकरे) घेतलेला मेळावा हा मराठीच्या विजयापुरता मर्यादित होता असंही राज यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांचे समर्थक गोंधळले आहेत. दुसऱ्या बाजूला निवडणुका जाहीर झाल्यावर युतीबाबत निर्णय घेऊ, असं मत शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. तसेच ते म्हणाले, “ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत यासाठी अनेकांचे प्रयत्न चालू आहेत.”
शिवसेनेच्या (शिंदे) आमदारांमुळे व मंत्र्यांमुळे पक्ष सध्या अडचणीत सापडला आहे. यामुळे पक्षाचे प्रमुख नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदार, मंत्री व पदाधिकाऱ्यांना तंबी दिली आहे. “बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागेल”, असं शिंदे म्हणाले आहेत. “कोणाच्याही कुटुंबावर कारवाई करायला आवडणार नाही. तुमच्याकडे दाखवलेलं बोट हे माझ्याकडे असतं”, असंही शिंदे म्हणाले. आमदार संजय गायकवाड व मंत्री संजय शिरसाटांच्या कारनाम्यावर शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही शिवसेना व मनसेमध्ये घडणाऱ्या घडामोडींवर आपलं लक्ष असेल.
दरम्यान, विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन चालू असून आज या अधिवेशनाचा १३ वा दिवस आहे. या अधिवेशनात काय घडतंय याबाबतचे अपडेट्स आपण या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.
Latest Maharashtra News Live Today : राज्यातील सामाजिक व राजकीय घडामोडींचा आढावा वाचा एकाच क्लिकवर.
गडचिरोलीतील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात; आदिवासी विकास विभागाने दिली धक्कादायक माहिती
भीमा नदीत अकरा बंधारे बांधणार; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची नेमकी घोषणा काय?
मद्यविक्री परवाने धोरणाविरोधात विरोधकांचे आंदोलन; ‘दारुवाल्या सरकारचा धिक्कार असो’च्या घोषणा
दोन्ही शिवसेनेच्या वादात मंत्र्यांचाच सभागृहात गोंधळ
पैठणमध्ये शंकरराव चव्हाण यांच्या पुतळा परिसराची दुरवस्था
मंत्री शिरसाट पुत्राचे आसवानी प्रकरण स्पष्टीकरण; कागदपत्रात विरोधाभास, इम्तियाज जलील यांचा आरोप
Video : मुंबई - गोवा महामार्गावर पाणीच पाणी...
सज्जनगुणी म्हणूनच शिवरायांना समर्थांकडून ‘श्रीमंत योगी’ उपाधी; रा. स्व. संघाचे केंद्रीय सदस्य भैयाजी जोशी यांचे प्रतिपादन
पुणे - नाशिक महामार्गावर अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडला २६४ किलो गांजा
पंधरा दिवसांच्या खंडानंतर सांगली जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन
...आणि १९ सप्टेंबरला फुटणार आतली बातमी
कापूस उत्पादनात अकोल्याची राष्ट्रीय पातळीवर छाप! ‘एक जिल्हा एक उत्पादन २०२४’ मध्ये महाराष्ट्र चमकला; ‘या’ जिल्ह्यांना...
Uddhav Thackeray : "आता राज ठाकरेही बरोबर आलेत", उद्धव ठाकरेंचं मनसेच्या युतीबाबत मोठं विधान; मुलाखतीचा टीझर लॉन्च
रायगड किल्ल्यावर जाणारा पायरी मार्ग बंद; अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
Video : रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत, राजापुर, संगनेश्वर, चिपळूण व खेड तालुक्यात पूरस्थिती
शशिकांत शिंदे शरद पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष, पक्षाच्या बैठकीत घोषणा
शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष असतील. पक्षाच्या बैठकीत याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून अता शिंदे महाराष्ट्रात पक्षाची धुरा सांभाळतील.
बुलढाणा: गुटखा तस्करीचे 'एमपी कनेक्शन' उघड
मताधिक्य घटल्याने लातूरमध्ये अमित देशमुख ‘जमिनीवर ’
बोगस बियाणे! दोषी अधिकाऱ्यांवर होणार हत्या सदृश्य गुन्हे दाखल ? कृषी खात्यात खळबळ….
"आमची लाज काढू नका, तुम्ही काय केलं ते सांगा", मंत्री शंभूराज देसाईंचा विधीमंडळात पुन्हा एकदा रौद्रावतार
महाराष्ट्रात कपाशीचे क्षेत्र १० टक्क्यांनी घटण्याची चिन्हे - शेतकऱ्यांचा मका, सोयाबीन, तूर पिकांवर भर
बागडे यांच्या भाषणातून चव्हाणांचा बौद्धिक वर्ग !‘संघर्ष करावा लागला; पण पक्षनिष्ठा सोडली नाही’
वनखात्यात पुन्हा महिला कर्मचाऱ्याचा छळ
बच्चू कडूंच्या भूमिकेने सरकारची कोंडी
कोकणात मुसळधार पाऊस, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प; जनजीवन विस्कळीत, मुंबई उपनगरांत पावसाचा जोर वाढला
कोकणात सध्या मुसळधार पाऊस चालू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात रिमझिम पाऊस चालू आहे तर लांजा तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. काजळी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने लांजा तालुक्यातील अंजणारी परिसर पाण्याखाली गेला आहे. येथील प्रसिद्ध दत्त मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या कशेडी घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. रस्त्यावरील दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे. परंतु, पावसामुळे या कामात अडथळा येत आहे.
"मोदी-भागवतांचे AK-47 ची पूजा करतानाचे फोटो, अर्बन नक्षल म्हणून कारवाई कराल का?" जनसुरक्षा कायद्यावरून वंचितचा सवाल
सोलापूरमध्ये महायुतीतील गटबाजी टोकाला
सोलापूर लोकसभा क्षेत्रात मजबूत ताकद असलेल्या भाजपचे एकूण सहापैकी पाच आमदार आहेत. परंतु ही वाढलेली ताकद हीच पक्षासाठी जणू शाप ठरल्याचे दिसून येते.
मुरलीधर मोहोळ पुण्याचे नवे कारभारी?
कार्यालयाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांतील नागरिक त्यांच्याशी जोडले जाणार आहेत.
अजित पवार-मुंडेंसाठीच्या अभीष्टचिंतनपर फलकावर वाल्मीक कराडचेही छायाचित्र
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून दोषारोपपत्रात नाव असलेल्या वाल्मीक कराडचेही छायाचित्र झळकत आहे.
ब्राह्मण मुख्यमंत्री आणि स्वतः मंत्री असतानाही गडकरी असे का म्हणाले, “महाराष्ट्राच्या राजकारणात ब्राह्मणांना किंमत नाही…”
नागपुरमधील एका कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वत:च्या जातीबद्दल उघडपणे वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी ब्राह्मण जातीचे काय दु:ख आहे याची माहिती दिली.
जनसुरक्षा कायद्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहित
शहरी नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी जनसुरक्षा कायदा आणल्याचा सरकारचा दावा अत्यंत हास्यास्पद आहे. हा कायदा आतून-बाहेरून काळा असून सामान्यांची गळचेपी करणारा आहे. सभागृहात सत्ताधारी पक्षाकडे बहुमत असल्याने त्यांनी बहुमताच्या जोरावर रेटून नेत कायदा मंजूर करून घेतला. सरकारने कायदा मंजूर करून घेतला असला तरी काँग्रेसचा विरोध कायम असून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात या काळ्या कायद्याची होळी केली जाईल,अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी येथे दिली.
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात गेल्या आठवड्यात जनसुरक्षा विधेयक मंजूर करण्यात आले. विधानसभेत या विधेयकाला काँग्रेसने पाठिंबा दिला तर विधानपरिषदेत विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ यांनी जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध असल्याचे स्पष्ट केले. जनसुरक्षा कायद्यामागचा हेतूच मुळात काळा आहे.