Maharashtra Politics News Updates, 07 August 2025: उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या दोन दिवसांच्या बीड दौऱ्यावर आहेत. यावेळी काल राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे अजित पवारांच्या दौऱ्यात अनुपस्थित राहिल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. अशात आता अजित पवार यांच्या भेटीसाठी धनंजय मुंडे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत.
दुसरीकडे, माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी मंत्रीपद काढून घेतल्यानंतर कृषी खाते दत्ता भरणे यांच्याकडे देण्यात आले होते. त्यानंतर आज दत्ता भरणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.
दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुकीला जवळपास एक वर्ष होत आले आहे. तरीही रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यात चुरस आहे. अशात काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात दिल्लीत बैठक झाली. यानंतर रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. यासह राज्यातील विविध क्षेत्रातील घडामोडींचा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आढावा घेऊया.
Mumbai Maharashtra Breaking News Live Today: महाराष्ट्र लाईव्ह अपडेट्स
आयटीआय मध्ये तांत्रिक शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्व विकासाचे २० अभ्यासक्रम; कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे प्रतिपादन
मालेगावचे सात यात्रेकरू उत्तरकाशीत सुखरूप
सायबर पोलिसांची तत्परता….अन् तक्रारदाराचे २० लाख परत
डॉ. विजयकुमार गावित आदिवासी खात्यात सर्वाधिक भ्रष्टाचार करणारा मंत्री… शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची टीका
चंद्या आणि आमशो या आमदारांची जिरवायची… माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावीत का संतापले ?
पंतप्रधान नरेंद्र मोदींना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिव शंकराची प्रतिमा भेट का दिली? ऑपरेशन सिंदूरशी या भेटीचा संदर्भ काय?.
कोणत्याही आपत्तीत मुख्यमंत्री फडणवीस यांना संकटमोचक गिरीश महाजन का आठवतात ?
"त्यांना पुढे पराभव दिसू लागतो, तेव्हा...", राहुल गांधींच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रया दिली आहे. "त्यांना (राहुल गांधी) पुढे जेव्हा पराभव दिसू लागतो, तेव्हा आगोदरपासून ते मैदान तयार करतात. त्यांना आता बिहारच्या निवडणुकीत पराभव दिसू लागला आहे. त्यामुळे हे आतापासून सुरू झाले आहेत. निवडणूक आयोगाने देखील वारंवर त्यांनी जेव्हा संशय व्यक्त केला तेव्हा सर्व दाखवलं आहे. आरोप करणं सोपं आहे. खोटे आरोप करणं हे प्रत्येक वेळी यशस्वी होत नाही, " असे एकनाथ शिंदे म्हणाले.,
कोल्हापूरात हिंदुस्तानी भाऊ विरोधात संताप, नागरिकांनी पोस्टरला मारले जोडे
महादेवी (माधुरी) हत्तीणीला वनतारामध्ये नेल्यानंतर कोल्हापूरच्या अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी महादेवीला परत आणण्याची प्रतिक्रिया व्यक्त केल्या होती. मात्र हिंदुस्तानी भाऊ नावाने ओळखला जाणारा विकास फाटक या व्यक्तीने कोल्हापूरकरांची बदनामी करणारी पोस्ट इन्स्टाग्रामवर केली होती. त्यामुळे कोल्हापूरात हिंदुस्तानी भाऊविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे.
यानंतर आज कोल्हापूरात हिंदुस्तानी भाऊविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज पेठेतील नागरिकांनी एकत्र येत तीव्र निषेध केला. हिंदुस्तानी भाऊविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत, त्याच्या पोस्टरला कोल्हापुरी चपलेने मारले. तसेच हिंदुस्तानी भाऊ कुठेही दिसला, तर त्याला कार्यकर्ते कोल्हापुरी चपलेने बडवतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
कोकण रेल्वे मार्गावर रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर विशेष गाड्या धावणार
"मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण पुढील वर्षभरात शंभर टक्के होणार", मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची माहिती
मागील १७ वर्षांपासून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम संथगतीने सुरू आहे. गणेशोत्सवापूर्वी या महामार्गाच्या कामाची पाहणी आज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली. यावेळी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पुढील वर्षभरात शंभर टक्के पूर्ण होणार असल्याची ग्वाही मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
पायाभूत चाचणीची समाजमाध्यमांत पेपरफुटी
कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलिसांचा साताऱ्यात कर्तव्य मेळावा
मुंबई-गोवा महामार्ग लवकर पूर्ण करा, पेणमधील नागरिकांनी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना निवेदन
मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकरच पूर्ण करा, आम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, अशी भावना पेण शहरातील नागरिकांनी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे व्यक्त केली. पेण शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गाठून नागरिकांनी त्यांना निवेदन दिले.
जळगावमध्ये बियर दिली नाही म्हणून गोळीबार; राजकीय वैरातून सरपंचानेच दिली होती सुपारी…
'महादेवी'साठी हत्तीच्या प्रतिकृतीसह दुचाकी रॅली; विविध सामाजिक संघटना, नागरिक, युवकांचा सहभाग
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघिणीसह बछड्यांचा आढळ
पुणे : "आम्ही देखील अरेरावीच्या भाषेने उत्तर देऊ", मनसेच्या आंदोलनानंतर उपायुक्त माधव जगताप यांचा इशारा
एकाच पदावर दोन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा ‘बेस्ट’ गोंधळ, फडणवीस आणि शिंदे यांच्यातील सुप्त संघर्ष उघड
सैन्य दलातील माजी अधिकारी-जवानांना पुन्हा सेवेची संधी
ज्योतिर्लिंग विकास आराखडा अंमलबजावणीसाठी सचिवांची नियुक्ती
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानंतर बच्चू कडूंच्या आंदोलनाला बळ!
गडचिरोलीत भीषण अपघात; ट्रकने सहा विद्यार्थ्यांना चिरडले, चौघांचा मृत्यू
गडचिरोली जिल्ह्यातील काटली गावाजवळ आज पहाटेच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात सहा विद्यार्थ्यांना ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उर्वरित दोघांची प्रकृती अत्यवस्थ असून, त्यांच्यावर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महादेवी हत्तीवरून कोल्हापुरात नेत्यांचीच धावपळ
Video : दारू पिण्यास पन्नास रुपये दिले नाही म्हणून डोक्यात घातल्या विटा; जखमी अत्यवस्थ
सातारा : खंबाटकी बोगद्याजवळ ट्रक उलटला
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
"आज मी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करतोय. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी हा पाहणी दौरा आहे. महाडला बैठक करून यानंतर रत्नागिरीला आम्ही जाणार आहोत. गणेशोत्सवापर्यंत महामार्गाचे काम शक्य होईल तितके पूर्ण करणार आहेत", असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटले आहे.
सांगलीत ३५ हजार मालमत्ता धारकांना जप्तीच्या नोटिसा, मालमत्ता कराची ९४ कोटींची थकबाकी
Maharashtra Breaking News Live Updates: व्हीव्हीपॅट नसेल तर महापालिका निवडणुका मतपत्रिकेवर घ्या; काँग्रेसची मागणी
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. काल इंडिया आघाडीतील विविध नेत्यांची भेट घेतल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत त्यांनी उपराष्ट्रपतींचा राजीनामा, बिहारमधील मतदार याद्यांचा घोळ आणि महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर भाष्य केले.
दरम्यान, राज्यातील स्थानिक निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर होणार नाही. यावर उद्धव ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अपारदर्शकता आणली असून व्हीव्हीपॅट मशिन्स काढून टाकण्यात आल्या आहेत. मग तुम्ही निवडणुका घेता कशाला?"
महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना पहिलीपासून मिळणार एनसीसी पद्धतीचे प्रशिक्षण; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची माहिती
महाराष्ट्र सरकार राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) च्या धर्तीवर इयत्ता पहिलीपासून प्रशिक्षण सुरू करण्याची योजना आखत आहे, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. या योजनेची व्यवहार्यता तपासण्यासाठी त्यांनी वरिष्ठ एनसीसी अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा झाली आहे. मंत्रालयात झालेल्या बैठकीत, राज्यभर एनसीसीचा विस्तार, प्रशिक्षणाचे स्वरूप आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या मानवी संसाधनांवर चर्चा झाली, असे एका सरकारी निवेदनात म्हटले आहे. या बैठकीला शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल आणि शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह उपस्थित होते.
काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात दिल्लीत बैठक झाली. यानंतर रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. यासह राज्यातील विविध क्षेत्रातील घडामोडींचा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आढावा घेऊया.