Maharashtra Mumbai Live News Updates, 30 October 2025 : शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तसेच सुमारे २२ विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले आहेत. दरम्यान रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून दिलेले चर्चेचे दिलेले निमंत्रण कडू यांनी स्वीकारले आहे. मात्र याबरोबरच राष्ट्रीय महामार्गावरील ठिय्या आंदोलन नियोजित ठिकाणी सुरू राहणार असल्याची घोषणाही कडू यांनी केली आहे. मुख्यमंत्र्‍यांबरोबरच्या चर्चेत काय तोडगा निघणार हे पहावे लागणार आहे. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून आज मेळावा घेतला जाणार आहे. ज्यामध्ये मतदार याद्यांमधील घोळाबाबत प्रझेंटेशन दिले जाण्याची शक्यता आहे.

तर मोंथा चक्रीवादळाचा परिणाम राज्यातही पाहायला मिळत आहे. चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या स्थितीत मराठवाड्यातील लातूर, बीड, धाराशिव जिल्ह्यास पुन्हा पावसाने झोडपले. आजही राज्यातील विविध भागात पावसाची शक्यता आहे. या सर्व घडामोडींकडे आपले लक्ष असणार आहे.

Live Updates

Maharashtra Weather Today Live Updates : राज्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

14:24 (IST) 30 Oct 2025

Vasai Virar Farmer Compensation : नुकसानग्रस्त शेतीच्या पंचनाम्यांना सुरुवात ७८ हेक्टर शेतीची पाहणी पूर्ण

वसई-विरारच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीच्या वेळीच पाऊस कोसळल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला होता. ...सविस्तर बातमी
13:56 (IST) 30 Oct 2025
पुणे जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार अखेर रद्द! धर्मादाय आयुक्तांचे आदेश

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पुण्यातील जैन बोर्डिंग जमिनी व्यवहार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाची सुनावणी धर्मादाय आयुक्तांच्या समोर होत होती. यातील दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर हा व्यवहार रद्द करण्याचे आदेश धर्मादाय आयुक्ताकडून देण्यात आले आहेत.

13:52 (IST) 30 Oct 2025

Blood Donation : नवी मुंबईत रक्त तुटवडा; रक्तदान करण्यासाठी आवाहन

नवी मुंबई महानगर पालिका वाशी से १० येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात रक्ताचा तूटवडा आहे. ...सविस्तर वाचा
13:43 (IST) 30 Oct 2025

Thane Ring Metro : ठाणे अंतर्गत मेट्रोचे बांधकाम सुरू होणार नोव्हेंबर महिन्यात ? २०२९ पर्यंत प्रवासी सेवेत

ठाणे अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्प २९ किमी लांबीचा असून हा प्रकल्प शहराच्या पश्चिम पट्ट्यात एक वर्तुळाकार मार्ग तयार करेल. ...वाचा सविस्तर
13:36 (IST) 30 Oct 2025

ठाणे जिल्ह्यातील जि. प. आरोग्यवर्धिनी केंद्रातील योग शिक्षक मानधनापासून वंचित

मागील दीड ते दोन वर्षापासून ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या माध्यमातून या योग शिक्षकांच्या नियुक्या करण्यात आल्या आहेत. ...सविस्तर वाचा
13:24 (IST) 30 Oct 2025

Gold-Silver Price : काय सांगता ? सोने-चांदी आणखी स्वस्त... जळगावमध्ये आता ‘इतका’ दर

शहरातील सुवर्ण बाजारपेठेत बुधवारी सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याने खळबळ उडाली होती. ...वाचा सविस्तर
13:23 (IST) 30 Oct 2025

राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची बैठक

मुंबईतील वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये महाविकास आघाडी (MVA) ची बैठक सुरू आहे. या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे आणि महाविकास आघाडीचे इतर नेते उपस्थित आहेत.

13:23 (IST) 30 Oct 2025

Unseasonal Rainfall : धुळे जिल्ह्यातील कापूस, मका, बाजरी, ज्वारीसह अनेक पिकांचे नुकसान

महसूल विभागाच्या प्राथमिक पंचनाम्यानुसार एकूण एक ९९७ शेतकऱ्यांच्या अंदाजे एक हजार ५०५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये कापूस, मका, बाजरी, खरीप ज्वारी आणि तूर या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. ...सविस्तर वाचा
13:16 (IST) 30 Oct 2025

VVPAT EVM Controversy : 'स्थानिक' निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर होणार? कायदा काय सांगतो?; निवडणूक आयोग म्हणते, 'अभ्यास...'

Local Body Elections Maharashtra : मतचोरी, मतदार यादीतील घोळावरून राजकीय वातावरण तापले असताना राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. ...सविस्तर वाचा
13:14 (IST) 30 Oct 2025

Police Recruitment: भरपूर झाला सराव, आता पोलीस भरतीसाठी तय्यार; नाशिक ग्रामीण पोलीस दलात ३८० जागांवर भरती

नाशिक ग्रामीण पोलीस दलात २१० शिपाई, ५२ चालक, तर कारागृह दलात ११८ शिपाई अशा एकूण ३८० जागांवर भरती होत आहे. विशेष म्हणजे या भरतीत २०२२ ते २०२५ दरम्यान वयोमर्यादा ओलांडलेल्यांनाही संधी मिळणार आहे. ...अधिक वाचा
13:12 (IST) 30 Oct 2025

गिरीश महाजन, छगन भुजबळ, दादा भुसे यांच्यात एकच बंधन, नेमके काय ?

कुंभमेळा मंत्री समितीच्या बैठकीच्या निमित्ताने हे मंत्री अलीकडेच अन्य एका स्पर्धक मंत्र्यासोबत मुंबईत एकत्र आले होते. कुंभमेळ्याला अतिशय कमी कालावधी आहे. या नियोजनासाठी मंत्री समितीची स्थापना होऊन महिना उलटल्यानंतर बैठकीला मुहूर्त लाभला. ...सविस्तर बातमी
12:53 (IST) 30 Oct 2025

परभणी जिल्ह्यात जोरदार पाऊस, रब्बी पेरण्यांचाही खोळंबा; वेचणीसाठी आलेला कापूस भिजल्याने मातीमोल

आज झालेल्या पावसाने शेतातला वेचणीसाठी आलेला कापूस भिजला असून हा कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा फटका आहे. ...सविस्तर बातमी
12:42 (IST) 30 Oct 2025

दिवाळी संपली मात्र बोईसरच्या पदपथावरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण कायम

बोईसर परिसरातील नागरिकांना रेल्वे स्थानक, बस स्थानक पायी गाठणे सुलभ व्हावे तसेच बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी वाहनांच्या गर्दीतून वाट काढत भर रस्त्यातून चालण्याची वेळ येऊ नये यासाठी बोईसर ग्रामपंचायतीमार्फत मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा नवीन पदपथ बांधण्यात आले आहेत. ...सविस्तर बातमी
12:40 (IST) 30 Oct 2025

MPSC Result : 'एमपीएससी'च्या वनसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, नोव्हेंबर महिन्यात होणार मुलाखती

MPSC Forest Service Exam : या परीक्षेमध्ये सहायक वनसंरक्षक आणि इतर वनसेवा पदांसाठी निवड होते, ज्यासाठी पदवीधर उमेदवारांची निवड केली जाते. ...वाचा सविस्तर
12:39 (IST) 30 Oct 2025

Video: वाहतूक पोलिसच जाळ्यात अडकले, तरुणाने व्हिडिओ काढत पोलिसांचे चलान फाडले...

वागळे इस्टेट भागातील अंबिका नगर परिसरात शिपायाचा एका दुचाकीस्वाराशी वाद होत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही बाब उघडकीस आली. ...वाचा सविस्तर
12:30 (IST) 30 Oct 2025

Nagpur Farmers Protest : चिमुकल्याचे जोशपूर्ण भाषण, म्हणाला “फडणवीस पहिली गोळी माझ्यावर....”

Bacchu Kadu Farmers Protest Nagpur : बुधवार रात्री जेव्हा पोलीस न्यायालयाचा आदेश घेऊन आंदोलनस्थळी आले तेव्हा आंदोलक कमालीचे संतप्त झाले होते. ...वाचा सविस्तर
12:22 (IST) 30 Oct 2025

अधिकारी बदलताच टिटवाळा, मोहने, आंबिवलीत बेकायदा बांधकामांना उधाण

मागील वर्षभर पूर्णपणे थांबविण्यात आलेली बेकायदा बांधकामे आता नव्याने सुरू झाल्याने टिटवाळा, मांडा, मोहने, आंबिवली, शहाड, वडवली, बनेली, बल्याणी, नांदप रस्ता, वासुंद्री रस्ता भागातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. ...सविस्तर बातमी
12:15 (IST) 30 Oct 2025

Election Commission: नवी मुंबईत मतदारांचा पत्ता आयुक्तांचे निवास स्थान…!

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विविध कारणांमुळे गेल्या काही वर्षांपासून लांबणीवर गेल्या होत्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुका जानेवारी २०२६ पर्यंत घेण्याचे निर्देश दिल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणीला सुरू झाली आहे. ...सविस्तर वाचा
12:14 (IST) 30 Oct 2025

निवृत्तीवेतनाच्या भानगडी? आता त्या दूर करणारी सुविधा १ नोव्हेंबरपासून होणार उपलब्ध...

ऑनलाईन माध्यमातून या तक्रारी दूर करता आल्या पाहिजे म्हणून यासाठी निवृत्तीवेतन वाहिनी ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार झाल्याचे वित्त विभागाने स्पष्ट केले आहे. ...अधिक वाचा
12:01 (IST) 30 Oct 2025

खारेगाव येथे नियंत्रक शिधावाटप विभागाची गॅस टॅंकरवर मोठी कारवाई; ५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

फिरत्या पथकाने बुधवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास कळवा खारेगाव परिसरात अचानक छापा टाकला असता, टॅंकरमधून व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये अवैधरित्या गॅस भरण्याचा प्रकार उघडकिस आला. ...सविस्तर वाचा
11:56 (IST) 30 Oct 2025

तळोज्यात दोन हृदयद्रावक आत्महत्या; विद्यार्थिनीचा मानसिक ताण व विवाहितेचा हुंडाबळी

तळोज्यात १९ वर्षीय विद्यार्थिनीने इमारतीवरून उडी मारून, तर विवाहितेने हुंडाबळीमुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन्ही घटनांनी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ...वाचा सविस्तर
11:46 (IST) 30 Oct 2025

ठाणे महापालिकेची पाणी देयक वसुली मोहीम सुरू; थकबाकीदारांची नळ जोडणी खंडित करण्याची कारवाई सुरू

पाणी देयकांचे उदीष्ट पुर्ण करण्यासाठी ठाणे महापालिकेने पाणी देयकांच्या वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेतली असून, यात थकबाकीदारांची नळ जोडणी खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात येत आहे. ...सविस्तर बातमी
11:43 (IST) 30 Oct 2025

Farmers Protest Nagpur : सरकारकडून शेतकरी आंदोलकांची फसवणूक; चर्चेचा प्रस्ताव देऊन नेत्यांना अटक

ही कारवाई अचानकपणे करण्यात आली असून त्यामुळे शेतकरी संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शेतकरी नेते अजित नवले यांनी या अटकेचा निषेध नोंदवला आहे. ...सविस्तर वाचा
11:36 (IST) 30 Oct 2025
"चांगला निर्णयही कधीकधी विरोधात वाटत असतो", मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वी बच्चू कडू काय म्हणाले?

आज संध्याकाळी सात वाजता बच्चू कडू हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. यापूर्वी आंदोलकांना सबोधित करताना कडू म्हणाले की, आंदोलनात काही गोष्टी भेटल्या नाहीत तरी काही गोष्टी फार मोठ्या उभ्या राहत असतात. एकदा ही वज्रमूठ उभी झाली की, यातून शेतकऱ्यांच्या आंदोलकांचं एक चांगलं भविष्य उभे राहिल अशी अपेक्षा आहे. माध्यमांनी हे आंदोलन महाराष्ट्रभर पोहचवलं, लोकांच्या मनापर्यंत नेलं. वरचा देव पावला आता खालचा देव पावतो का नाही हे आपल्याला खरंतर संध्याकाळी सात वाजता दिसणार आहोत. आंदोलनात आपण जिंकतो पण कधीकधी तहात हरत देखील असतो. एखादा निर्णय झाला तर चांगला निर्णयही कधीकधी विरोधात वाटत असतो, असं बऱ्याच आंदोलकांच्या बाबतीत आपण नेहमीच होताना पाहिलं आहे. पण आपण आंदोलन करतोय हे महत्त्वाचं आहे. निर्णय कमी जास्त होतातच. एखादा निर्णय सर्वच कार्यकर्त्यांना पटेल असे होत नाही. आंदोलनाबाबत प्रामाणिकपणा असणं महत्त्वाचं आहे, असे बच्चू कडू म्हणाले.

आपण यश घेऊनच येऊ, नाही यश भेटलं तर आंदोलन करायला आपल्याला कोणाच्याही परवानगीची आवश्यकता नाही, असेही बच्चू कडू म्हणाले.

11:35 (IST) 30 Oct 2025

Nagpur Farmers Protest : शेतकरी नेत्यांचा राज्यमंत्र्यांवर प्रश्नांचा भडीमार

राज्यमंत्र्यांना अधिकार काय? सरकारने त्यांना चर्चेला का पाठवले,असे एक नव्हे तर अनेक प्रश्न शेतकरी नेत्यांनी करून त्यांना भांडावून सोडले. ...अधिक वाचा
11:30 (IST) 30 Oct 2025

‘पुनर्वापरातील पाणी वापर प्रकल्पा’ने टंचाईवर मात; पनवेल महापालिकेची दीर्घकालीन उपाययोजना

सध्या पनवेल महापालिका क्षेत्राला २५८ एमएलडी पाण्याची गरज असली तरी सुमारे २९ एमएलडी पाणी कमी पडत असल्याने नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा करावा लागतो. ...सविस्तर बातमी
11:30 (IST) 30 Oct 2025

कळवा रुग्णालयात वाॅर्डचे नुतनीकरण पण, प्राणवायु वाहीनीचा पत्ताच नाही; प्राणवायु वाहीनी बसविण्यासाठी निविदा काढली नसल्याने...

ठाणे महापालिकेचे कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आहे. सुमारे पाचशे खाटांचे हे रुग्णालय असून येथे ठाणे शहर तसेच आसपासच्या शहरासह ग्रामीण भागातील रुग्ण उपचारासाठी येतात. ...सविस्तर वाचा
11:30 (IST) 30 Oct 2025

व्हिएतनाम येथील हिरव्या भाताची रायगडमध्ये लागवड…

पनवेल तालुक्यातील मिनेश गाडगीळ यांनी गेल्या वर्षी निळ्या आणि जांभळ्या रंगाच्या भात लागवडीचे प्रयोग यशस्वीपणे केले होते. त्यापुर्वी काळ्या आणि लाल रंगाच्या भात लागवडही त्यांनी यशस्वी करून दाखवली होती. ...वाचा सविस्तर
11:30 (IST) 30 Oct 2025

तेजस एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना नाश्त्याऐवजी १० रुपयांचा बिस्कीट पुडा; ठेकेदाराकडून प्रवाशांची लूट

दिवाळी सणानंतर कोकणातून मुंबईत येण्यासाठी श्रेयस पटवर्धन यांनी शनिवारी तेजस एक्स्प्रेसचे आरक्षण केले. वेळापत्रकानुसार कुडाळ स्थानकात सायंकाळी ५ वाजता येणारी गाडी एक तास विलंबाने दाखल झाली. ...सविस्तर बातमी
11:25 (IST) 30 Oct 2025

सुनियोजित शहरात इमारतींची अग्निसुरक्षा धोक्यात; दहा महिन्यांत आगीच्या ५९३ घटना

अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरात दरमहा सरासरी ५० ते ६० आगीच्या घटनांची नोंद झाली आहे. या घटनांमागे शॉर्टसर्किट, गॅस गळती आणि इमारतींमधील निष्क्रिय अग्निसुरक्षा यंत्रणा ही प्रमुख कारणे असल्याचे अग्निशमन विभागाने स्पष्ट केले आहे. ...सविस्तर वाचा