Maharashtra Monsoon Session 2025 Highlights, 09 July : कामगार संघटनानी आज देशव्यापी संपाची हाक दिली आहे. याचा परिणाम राज्यातही पाहयला मिळू शकतो. याबरोबरच आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टिनमधील एका कर्मचाऱ्याला मारहाण केली असून याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटताना पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत विधानभवनात सत्ताधारी आणि विरोधक विविध मुद्द्यांवर एकमेकांसमोर उभे ठाकल्याचं पाहायला मिळत आहे.तर सभागृहाबाहेर राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीची जोरदार चर्चा होत आहे. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आपापली ताकद आजमावून पाहात असताना जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसानंही राज्यभर जोरदार हजेरी लावल्याचं दिसत आहे. या आणि इतर महत्त्वाच्या घडमोडी आज आपण या लाईव्ह ब्लॉगमध्ये पाहणार आहोत.

Live Updates

Latest Maharashtra News Live Today : महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एकाच ठिकाणी...

19:26 (IST) 9 Jul 2025

विक्रमी वेळेत जायकवाडीतील जलसाठा ६५ टक्क्यांवर; समन्यायी तत्वानुसार पाणी वाटप विषय संपुष्टात

जायकवाडीची पाणी साठवण क्षमता १०२.६५ टीएमसी असून त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा ७६.६५ टीएमसी आहे. ...सविस्तर बातमी
18:34 (IST) 9 Jul 2025

गुड्ड्या हत्या प्रकरणातील दोघा संशयितांना धुळे शहरात प्रवेश बंदी

शहरातील एकाची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी कारागृहात असणाऱ्या दोन हल्लेखोरांना काही दिवसांपूर्वी न्यायालयाने अटी-शर्तीवर जामीन मंजूर केला. ...सविस्तर वाचा
18:23 (IST) 9 Jul 2025

धक्कादायक! भरदिवसा कारमध्ये अतिप्रसंगासाठी जबरदस्ती

एका विमा कंपनीतील व्यवस्थापक तरुणीवर त्याच कंपनीच्या एजन्टने भरदिवसा कारमध्ये अतिप्रसंगासाठी जोर जबरदस्ती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...अधिक वाचा
18:18 (IST) 9 Jul 2025

मोदी सरकारमध्ये महत्वाचे मंत्री असलेल्या गडकरींचे ‘ड्रीम प्रोजेक्ट’ धोक्यात; प्रकरण न्यायालयात गेल्याने...

नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने नागपूरमध्ये विकसित करण्यात आलेल्या काही प्रकल्पांना पर्यावरणवादी व स्थानिक नागरिकांकडून विरोध झाला आहे. ...सविस्तर वाचा
18:17 (IST) 9 Jul 2025

गोंडवाना विद्यापीठात कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण? कुलसचिव व वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

गोंडवाना विद्यापीठात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वेतनातून संबंधित कंत्राटदार कंपनी मोठी कपात करीत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. ...सविस्तर बातमी
17:27 (IST) 9 Jul 2025

पूर्व विदर्भातील पूरस्थिती नियंत्रणात; नागरिकांसाठी बचावकार्य सुरू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभा सभागृहात पूर्व विदर्भातील मुसळधार पावसासंदर्भात माहिती देत येथील पूर परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पावसामुळे एस.टी. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना जवळच्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले व नंतर सर्व प्रवाशांना सुखरूप घरी पाठवण्यात आले आहे. गडचिरोली ते नागपूर (आरमोरी) मार्ग सध्या बंद असून, वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. गोसीखुर्द धरणातून पाणी सोडण्यात आल्याने, गडचिरोलीपर्यंत सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर शहरातील सखल भागांत पाणी साचल्याची दखल घेऊन, बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. या पूरस्थितीत एक व्यक्ती वाहून गेल्याचीही माहिती त्यांनी दिली.

पूर परिस्थिती लक्षात घेता एनडीआरएफ आणि एसडीआरएफ या दोन्ही यंत्रणांना सज्ज ठेवण्यात आले असून, नागपूर जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. संबंधित यंत्रणांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहनदेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. विधानसभा सदस्य आ. नाना पटोले यांनी याविषयावर सभागृहात मुद्दा उपस्थित केला होता.

17:15 (IST) 9 Jul 2025

जळगावात हतनूर धरणातील सहा दरवाजातून विसर्ग…तापी नदी पाणी पातळीत वाढ

विदर्भात तसेच पाणलोट क्षेत्रातील जोरदार पावसानंतर पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पाटबंधारे विभागाला तापी नदीवरील हतनूरचा विसर्ग वाढवावा लागला आहे. ...सविस्तर बातमी
16:21 (IST) 9 Jul 2025

नागपूरला लवकरच भोंसला विद्यापीठ; मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण संस्थेचा निर्णय

विद्यार्थी केंद्रभूत ठेवून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला साजेशा नियमित शिक्षणाबरोबर सैनिकी, क्रीडा साहसविषयक शिक्षण, शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्व प्रकारचा सुविधा देणे यांसारख्या बाबींना प्राधान्य देत भोंसला विद्यापीठ स्थापन करण्याचे निश्चित करण्यात आले. ...वाचा सविस्तर
16:01 (IST) 9 Jul 2025

धुळ्यात कर्मचारी, कामगार, शिक्षकांचा मोर्चा

धुळे शहरातील कल्याण भवनजवळून मोर्चाला सुरुवात झाली. र क्युमाईन क्लबसमोर मोर्चा आल्यानंतर शिष्टमंडळातर्फे प्रशासनाला विविध २० मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ...वाचा सविस्तर
15:58 (IST) 9 Jul 2025
शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाडांवर सोपवली मोठी जबाबदारी, सोशल मीडियावरून दिली माहिती

"नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मान्यतेने माननीय आमदार जितेंद्र आव्हाड यांची पक्षाच्या 'मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते' पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे विचार आणि ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि पक्षाची अधिकृत भूमिका जनतेसमोर मांडण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांचे निश्चित सहकार्य लाभेल. आपल्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! " अशी पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून करण्यात आली आहे.

15:52 (IST) 9 Jul 2025

नाशिक विमानतळावर इमिग्रेशन तपासणी केंद्रासाठी अमित शहा यांना साकडे

आगामी कुंभमेळा नियोजनात नाशिक विमानतळावर इमिग्रेशन तपासणी केंद्र (परदेशी प्रवासासाठी) तातडीने मंजूर करण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. ...वाचा सविस्तर
15:17 (IST) 9 Jul 2025

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांना लिहिले पत्र; केली ही मागणी…

निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात अद्यापही पुरेसा पाऊस न झाल्याने डाव्या व उजव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विद्यमान जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांना पत्र लिहून केली आहे. ...सविस्तर वाचा
15:12 (IST) 9 Jul 2025

Suresh Dhas : मुलाच्या कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, आमदार सुरेश धसांचं स्पष्टीकरण; म्हणाले, "अटकेची कारवाई…"

भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ...सविस्तर वाचा
15:06 (IST) 9 Jul 2025

अंबरनाथ येथे एका बारा वर्षीय मुलाला लिफ्ट मध्ये मारहाण

- पालेगाव परिसरातील एका इमारतीमधील घटना

- एका बारा वर्षीय मुलाला लिफ्ट मध्ये मारहाण

- मला बघून लिफ्ट का बंद केली? या कारणावरून मारहाण

- हाताचा घेतला चावा, मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद

- इमारतीबाहेर भेटला तर तुला मारून टाकू, अशी धमकीही दिली

13:56 (IST) 9 Jul 2025

सत्ताधाऱ्यांचे गुरू दिल्लीत बसलेत; गुरूंची आज्ञा पाळून शिक्षकांवर अन्याय…

राज्य शासनाने ऑक्टोबर २०२४ मधील अधिवेशनात राज्यातील विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यासंदर्भात निर्णय घेतला. मात्र, अद्यापही निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. ...वाचा सविस्तर
13:40 (IST) 9 Jul 2025

कामगार संघटनांची भारत बंदची हाक! रत्नागिरी जिल्ह्यातील 26 बँका संपात सहभागी

कामगार संघटनांचा आज देशव्यापी बंद पुकारला आहे. यानिमीत्त केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात रत्नागिरी बँक कर्मचाऱ्यांची निदर्शन केली. यावेली कामगार विरोधी धोरणाच्या अनुषंगाने घोषणाबाजी करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील 26 बँका संपात सहभागी झाल्या आहे. त्यामुले बँकांचे आर्थिक व्यवहार आज पूर्णपणे बंद आहेत. याबद्दल विनोद कदम, स्टेट बँक महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉयी फेडरेशन सेक्रेटरी यांनी माहिती दिली आहे.

12:56 (IST) 9 Jul 2025

Bhandara Rain Updates: भंडारा जिल्ह्यातील तब्बल ८० मार्ग बंद, अनेक गावांना पुराचा वेढा

जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक १६४.७ मिमी पावसाची नोंद लाखांदूर तालुक्यात करण्यात आली असून ४० मंडळापैकी सर्वाधिक सिहोरा येथे ३४०. ९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ...सविस्तर वाचा
12:24 (IST) 9 Jul 2025

Chandrapur Rain News: चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचे धुमशान, नदी-नाले तुडुंब, अनेक मार्ग बंद

गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात ४९.८ मिमी पावसाची नोंद झाली. ब्रह्मपुरीत १६२.८, तर नागभीड तालुक्यात १५२.४ मिमी पावसाची नोंद झाली. ...वाचा सविस्तर
12:14 (IST) 9 Jul 2025

CM Devendra Fadnavis on Nagpur Rain: नागरिकांनी काळजी घ्यावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

जिल्ह्यातील पावसाच्या स्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर जिल्हाधिकारी, नागपूर महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांकडून आढावा घेतला. ...सविस्तर बातमी
11:57 (IST) 9 Jul 2025
एकजण वाहून गेला, आज परिस्थिती बिघडू शकते; नागपूर पूर परिस्थितीबाबत फडणवीसांनी विधानसभेत दिली माहिती

"नागरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात पूराची स्थिती निर्माण झाली आहे. तथापी, एसटीच्या बस अडकल्या होत्या, त्यामधील प्रवाशांना काढून त्यांना नजीकच्या शाळेमध्ये ठेवलं, त्यांची सगळी व्यवस्था केली आणि आता त्यांना पाठवण्याची व्यवस्था केली आहे. गडचिरोलीकडून नागपूरकडे आरमोरी मार्गे जो रस्ता आहे तो बंद आहे, नेहमीचा रस्ता सुरू आहे आणि त्याचाच वापर सध्या सुरू आहे, " असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

"गोसेखूर्दचं पाणी सोडलं तेव्हा ते पाणी जिथंपर्यंत जाऊ शकतं, त्या गडचिरोलीपर्यंत सर्वांना अलर्ट दिला आहे. त्यानुसार कारवाई सुरू आहे. नागपूर शहरात काही सखल भागात पाणी गेलं आहे, तिथं आपल्याला काही बचावकार्य करावं लागलेलं आहे. एक व्यक्ती वाहून गेल्याची माहिती मिळालेली आहे. एसडीआरएफ आणि एनडीआरएफला सज्ज ठेवलेलं आहे. आत्ताच्या परिस्थितीत कंट्रोल डिस्चार्ज असल्याने अजूनतरी खूप भीषण परिस्थिती तयार झालेली नाही. पण आजही ऑरेंज अलर्ट आहे त्यामुळे परिस्थिती बिघडू शकते, त्यानुसार एनडीआरएफ आणि एसडीआरएफला तयार ठेवलं आहे," अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

11:27 (IST) 9 Jul 2025

हिंदी-मराठीचा वादात प्रसिद्धीसाठी उडी घेतली, ठाकरेंच्या शिवसेनेवर मनिषा कायंदेंचा आरोप

हिंदी-मराठीचा वाद राज ठाकरे उचलला पण उबाठाने प्रसिद्धीसाठी त्यात उडी घेतली. त्यात ते स्वत:ची राजकीय पोळी भाजण्याचं काम करत आहेत. सध्याच्या परिस्थितीत सगळ्यात गोंधळलेला पक्ष उबाठा आहे. काल पन्नास खोके बोलण्याचा काही विषय नव्हता, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले, पक्षाला त्यांनी 60 आमदार, 7 खासदार दिले आणि सिद्ध केलंय शिवसेना ही त्यांची आहे आणि हेच उबाठाला खपत नाहीये, अशी प्रतिक्रिया आमदार मनिषा कायंदे यांनी दिली आहे.

11:25 (IST) 9 Jul 2025

गिरणी कामगार, शेतकरी, शिक्षकांच्या प्रश्नांसंदर्भात विरोधकांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

गिरणी कामगार, शेतकरी, शिक्षकांच्या प्रश्नांसंदर्भात विरोधकांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी विरोधी पक्षांच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचे पाहायला मिळाले.

11:06 (IST) 9 Jul 2025

नागपूर शहर-जिल्ह्यातील पावसाच्या स्थितीचा मुख्यमंत्री फडणवीसांकडून आढावा; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

नागपूर शहर-जिल्ह्यातील पावसाच्या स्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर जिल्हाधिकारी, नागपूर महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांकडून आढावा घेतला. सद्या परिस्थिती नियंत्रणात आहे. तथापि कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ चमू सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आज जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर केली आहे. नागरिकांनी सुद्धा सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे, अशी माहिती सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

Latest Maharashtra News Live Today : महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एकाच ठिकाणी...